Viral Video : मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल, पाहून नेटकरी संतापले!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल, पाहून नेटकरी संतापले!

Viral Video : मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल, पाहून नेटकरी संतापले!

Updated Jul 13, 2024 05:39 PM IST

Principal- Teacher Obscene Video: मुख्याधापक आणि शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मुख्याधापक आणि शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
मुख्याधापक आणि शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

Uttar Pradesh Jaunpur School Viral Video: उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे, जिथे शाळेतील एक महिला शिक्षिका मुख्याध्यापकांसोबत अश्लील कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओ व्हायरल होताच दोघांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक वर्गांमध्ये नाराजी पसरली आहे.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका कॉन्व्हेंट शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये शाळेचे मुख्यधापक एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. ही महिला शाळेचीच शिक्षिका असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुख्यधापक आणि शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

@ManojSh28986262 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "मुख्याध्यापकांनी शिक्षणाचे मंदिराला बदनामीचा अड्डा बनवला आहे. अशा शिक्षकांकडून मुलांना कोणत्या शिक्षणाची अपेक्षा ठेवावी?" या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एक युजरने म्हटले आहे की, यात फक्त मुख्यधापकांची चूक नाही, महिला शिक्षिकाही दोषी आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, त्यांनी हवे ते करावे, पण शाळेत अशा गोष्टी करायला नको होत्या.

मुख्यधापक आणि शिक्षिकेला नोटीस

व्हायरल व्हिडिओची दखल घेत बीएसएने मुख्यधापक आणि शिक्षिकेला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले आहे. एवढेच नाही तर शाळेची मान्यता रद्द होण्याचीही चर्चा आहे. शाळेत महिला शिक्षिकेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु, ही घटना नेमकी कधीची आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सुमारे सात मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक महिला शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

शिक्षकाचा विद्यार्थिनीसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

याआधी उत्तर प्रदेशच्या शादियाबादमधून एका शिक्षकाचा विद्यार्थिनीसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. शिक्षकाने विद्यार्थीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने विद्यार्थीसोबत शाररिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ गुपचूप आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. परंतु, हा व्हिडिओ सेव्ह होण्याऐवजी सोशल मीडियावर शेअर झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर