Crime: शिक्षकाचा फोटो लावून अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टावर टाकला, माजी विद्यार्थ्याला अटक-uttar pradesh former btech student posted teachers obscene video on instagram in kanpur ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime: शिक्षकाचा फोटो लावून अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टावर टाकला, माजी विद्यार्थ्याला अटक

Crime: शिक्षकाचा फोटो लावून अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टावर टाकला, माजी विद्यार्थ्याला अटक

Sep 21, 2023 04:17 PM IST

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी माजी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

Obscene Video
Obscene Video

Btech Student Posted Teachers Obscene Video: उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी उघडकीस आलीय. इंजिनअरिंगच्या एका माजी विद्यार्थ्याने त्याच्या कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा फोटो लावून अश्लील व्हिडिओ बनवला. यानंतर फेक अकाऊंटद्वारे इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळताच शिक्षकानेस्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकाच्या माजी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या काकदेव परिसरात कोचिंग इंस्टिट्यूट आहे, जिथे पीडित शिक्षिक मुलांना शिकवते. दरम्यान, सोशल मीडियावर पीडित शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर पीडितेने ताबडतोब स्थानिक पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने फेक अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी आयपी एड्रेस शोधून काढला असता नमन नावाच्या तरुणाचा यात हात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकसी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

आरोपी तरूण शिक्षकाचा माजी विद्यार्थी आहे. त्याला हे शिक्षक आवडत नसे. अभ्यास किंवा इतर कारणांवरून शिक्षक त्याला सगळ्यांसमोर ओरडायचे, याचा सूड घेण्यासाठी आरोपीने शिक्षकाची बदनामी करण्याचा निर्णय घेतला. त्याने शिक्षकाचा फोटो लावून अश्लील व्हिडिओ तयार केला आणि फेक आयडीद्वारे इन्स्टाग्रामवर अपलोड केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Whats_app_banner
विभाग