Obscene Video: मॅडम तुमचे अश्लील व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल; विद्यार्थ्यांचे ऐकून शिक्षिका शॉक!-uttar pradesh female teacher obscene video goes viral in gorakhpur ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Obscene Video: मॅडम तुमचे अश्लील व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल; विद्यार्थ्यांचे ऐकून शिक्षिका शॉक!

Obscene Video: मॅडम तुमचे अश्लील व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल; विद्यार्थ्यांचे ऐकून शिक्षिका शॉक!

Dec 09, 2023 04:17 PM IST

Teacher Obscene Video Goes Viral: उत्तर प्रदेशच्या गोरखपुरातील एका शिक्षिकेचे अश्लील व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे.

Teacher Obscene Video Viral In Uttar Pradesh
Teacher Obscene Video Viral In Uttar Pradesh

Gorakhpur Teacher Obscene Video Viral: उत्तर प्रदेशच्या गोरखपुरातील शिक्षिकेसह धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित शिक्षिकेचे अश्लील व्हिडिओ तयार करुन इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याची माहिती समोर आली. याबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती मिळताच शिक्षिकेला मोठा धक्का बसला. यानंतर शिक्षिकेने स्थानिक पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला सांगितले की कोणीतरी त्यांचे फोटो एडिट करुन अश्लील व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करत आहे. हे ऐकून शॉक झालेल्या शिक्षकाने पोलिसांकडे दाद मागितली. एसएसपीच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सायबर तज्ज्ञांचीही मदत घेत आहेत. संबंधित शिक्षिका गोरखपूरच्या कॉन्व्हेंट शाळेत शिकवते. या घटनेने शाळेतील प्रत्येकजण हैराण झाले आहेत.

एसएसपीला दिलेल्या अर्जात शिक्षिकेने म्हटले आहे की, ती गुरुवारी सकाळी शाळेत गेली, तेव्हा विद्यार्थ्यांनी तिला सांगितले की, कोणीतरी त्यांचा फोटो एडिट करत अश्लील व्हिडिओ बनवत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवला जात आहे.  तसेच अनेकांना फोटो आणि व्हिडिओसह फ्रेंड रिक्वेस्टही पाठवल्या जात आहेत.

व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून शिक्षिका हैराण झाली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातून कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी कुटुंबीयांसह एसएसपींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. एसएसपीच्या सूचनेवरून शहापूर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Whats_app_banner
विभाग