मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; संतापलेल्या नवऱ्यानं तिला जिवंत जाळलं आणि त्यानंतर...

बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; संतापलेल्या नवऱ्यानं तिला जिवंत जाळलं आणि त्यानंतर...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 20, 2023 04:32 PM IST

Uttar Pradesh Gotia village Murder: उत्तर प्रदेशच्या बरेली येथील गोटिया गावात पत्नीची हत्या केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.

husband kills wife
husband kills wife

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशच्या बरेली येथील गोटिया गावात मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवऱ्याने तिला जिवंत पेटवून दिले. यानंतर तिचा मृतदेह घराजवळील एका शेतात नेऊन फेकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेपाल सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशीरा नेपाल सिंहच्या पत्नीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत एका शेतात आढळून आला. यानंतर गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. या महिलेची हत्या करण्यात आली, असे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी नेपाल सिंहची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच नेपाल सिंहने पत्नीच्या हत्येची कबूली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाल सिंहच्या पत्नीचे गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. नेपाळ सिंहने शनिवारी त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. यानंतर त्याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. त्यानंतर तिचा मृतदेह एका शेतात नेऊन फेकला.

चार वर्षांच्या मुलीला फाशी देत दाम्पत्याची आत्महत्या

हैदराबादच्या मुशीराबाद येथे एका दाम्पत्याने पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करुन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, साई कृष्णा (पती) चित्रकला (पत्नी) आणि तेजस्वी (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही हैदराबाद शहरातील मुशीराबाद येथील गंगापुत्र कॉलनीतील भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्यांच्या एका शेजाऱ्याने त्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणताही प्रतिसात न मिळाल्याने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी साई कृष्ण यांच्या घराचा दरवाजा उघडला असता तिघेही छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

WhatsApp channel

विभाग