हे काय नवलच..! अंधारात बेडवर आलेल्या शेजाऱ्याला पत्नीने समजले पती, सत्य समजेपर्यंत झाला बलात्कार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हे काय नवलच..! अंधारात बेडवर आलेल्या शेजाऱ्याला पत्नीने समजले पती, सत्य समजेपर्यंत झाला बलात्कार

हे काय नवलच..! अंधारात बेडवर आलेल्या शेजाऱ्याला पत्नीने समजले पती, सत्य समजेपर्यंत झाला बलात्कार

Updated Oct 07, 2024 09:18 PM IST

उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये अंधारात एका विवाहित महिलेसोबत असा प्रकार घडला, जो ऐकून पोलीसही हैराण झाले. पलंगावर शेजारी येऊन पडलेल्या शेजाऱ्याला तिने आपला पती समजले. सत्य समोर येईपर्यंत बलात्कार झाला होता.

अंधाराचा फायदा घेत शेजाऱ्याने केला बलात्कार
अंधाराचा फायदा घेत शेजाऱ्याने केला बलात्कार

उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये अंधारात एका विवाहित महिलेसोबत असा प्रकार घडला, जो ऐकून पोलीसही थक्क झाले. जेव्हा ती एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तिला पोलिसांनी हाकलून दिले. त्यानंतर तिने न्यायालयात दाद मागितली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार भदोहीच्या गोपीगंज पोलिस ठाण्याच्या पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

गोपीगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष कुमार सिंह यांनी ३४ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीचा हवाला देत सांगितले की, १७/१८ जुलैच्या मध्यरात्रीनंतर तिचा शेजारी कांचू (३२) तिच्या शेजारी बेडवर येऊन झोपला. वीज नसल्याने महिलेला अंधारात वाटले की तिचा नवरा आला आहे. काही वेळाने त्यांच्या कृत्याने महिला त्रस्त झाली. मात्र तिला काही समजेपर्यंत व सत्य समोर येईपर्यंत शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

यानंतर महिलेने आरडाओरडा केला, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह आजूबाजूचे लोकही जमा झाले. महिलेने आरोपीला पकडून संपूर्ण घटना सांगण्यासाठी पोलिसांना फोन केला.  हा गोंधळ पाहून आरोपी कांचूचे दोन भाऊ गमाई आणि बोरा हेदेखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. त्यांनी महिलेला  शिवीगाळ केली.  पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्वजण पसार झाले होते.

या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  मात्र पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यातून हाकलून देण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी सबीहा खातून यांच्या न्यायालयात सुनावणी झाल्याने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने आरोपी कांचूविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सिंह म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार बलात्कार, धमकावणे यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आणि त्याचे दोन भाऊ घरातून पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर