यूपीच्या अलिगढमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पतीने पत्नीचा गळा फावड्याने कापून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. घटनेनंतर मारेकरी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर मुजफ्ता गावात ही घटना घडली. मूळचा बारला येथील गाझीपूर गावचा रहिवासी सुखवीर सिंग यांचा मुलगा भोला ऊर्फ उमेश सुमारे २० वर्षांपासून रायपूर मुझफ्ता येथील एका घरात कुटुंबासह राहत होता. रमेशला एक मुलगा आणि मुलगी आहे. तो मजुरी करतो. त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलाला ड्रग्जचे व्यसन आहे. या दाम्पत्यामध्ये अनेकदा वाद होत असत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ३२ वर्षीय पत्नी सरवन देवी शेजाऱ्याच्या घरी गेली. तेथून परतल्यावर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्याने भोला याने सरवनच्या गळ्यावर फावड्याने वार केले. या हल्ल्यात सरवनचा मृत्यू झाले. तिचा ओरड्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक पळत आले. मात्र संधी मिळताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
स्थानिकांनी सरवनला सीएचसीमध्ये दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी हा वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. एसपी देहात अमृत जैन यांनी सांगितले की, तरुणाने पत्नीची फावड्याने गळा कापून हत्या केली. आरोपी घटनास्थळावरून पसार आहे. त्याला ड्रग्जचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
सोनभद्र जिल्ह्यात एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कालू सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, १८ जानेवारी रोजी अनुपा कुमारी (वय २५, रा. झारखंड) या तरुणीचा मृतदेह जंगलात सापडला होता. मृत व्यक्ती ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ज्यामुळे तिचा पती राजू रंजन याला आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातूनच त्याने तिची हत्या केली.
संबंधित बातम्या