Viral News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात दोन महिला एका धार्मिक स्थळावर पूजेदरम्यान एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. या दोन महिलांमधील वाद सोडवताना लोकांना घाम फुटला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत की, काही कारणांवरून दोन महिलांमध्ये बाचाबाची होते. त्यानंतर वाद मिटण्याऐवजी आणखी पेटतो आणि दोघींमध्ये हाणामारी सुरू होते. भांडणात दोघेही जमीनीवर पडतात. मात्र, तरीही त्यांच्यातील भांडण थांबत नाही. एक व्यक्ती या भांडणाचा व्हिडिओ बनवत असून महिलांना भांडू नका असेही सांगत आहे.
या महिलांना भांडताना पाहून काही लोक घटनास्थळी येतात आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, दोन्ही महिला कोणाचेही ऐकत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला रामचरितमानसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, असे सांगितले जात आहे. मात्र, काही कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होतो आणि वादाचे रुपांतर भांडणात होते, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'एकीकडे पूजा सुरू आहे. तर, दुसरीकडे दोन महिलांमध्ये महाभारत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'मला वाटत नाही की, दोन्ही महिलांना भांडण मिटवायचे आहे.' एका युजरने व्हिडिओ बनवणाऱ्यावर संताप व्यक्त केला. 'भांडण सोडवण्याऐवजी तो व्हिडिओ बनवत आहे. आधी त्याला चोप दिला पाहिजे', असे त्याने म्हटले आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, 'आजकाल लोकांना खूप लवकर राग यतो. परंतु, रागाच्या भरात आपल्याकडून चुकीची गोष्ट घडू शकते.'
काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला, त्याचे रूपांतर हाणामारीत आणि शिवीगाळात झाले. व्हिडिओत दिसत आहे की,दोन्ही एकमेकांचे केस ओढताना आणि एकमेकांचे केस ओढतात. अशा घटनांची पुनरावृत्ती यापुढे लोकांना आश्चर्यचकित करत नाही किंवा निराश करत नाही. त्याऐवजी, त्यांच्यासाठी हा जवळपास रोजचा तमाशा बनला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.