Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशच्या मऊ येथे प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी चोप दिल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रेयसीला भेटण्यासाठी संबंधित तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी बाजारात गेला आणि तिथेच तिच्यासोबत अश्लील कृत्य करू लागला. प्रेमीयुगुलांच्या अशा कृत्यामुळे बाजारात आलेल्या लोकांना विशेषत: महिलांना लज्जा उत्पन्न झाली. तसेच प्रेयसीच्या गावकऱ्यांचा त्यांच्यातील प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तरुणाला पकडून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरात वाद पेटू नये म्हणून दक्षता वाढविण्यात आली आहे.
राणीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे शेजारच्या गावातील दुसऱ्या जातीतील २१ वर्षीय तरुणीशी अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाबाबत दोन्ही गावातील लोकांमध्ये नाराजी होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी राणीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुरहाट बाजार येथे पोहोचला. त्यानंतर कशाचाही विचार न करता भर बाजारात दोघेही अश्लील कृत्य करू लागले. प्रेयसीच्या गावातील लोकांना प्रियकर आल्याची माहिती मिळताच गावकरी खुरहाट बाजार येथे पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी प्रियकराला पकडून बेदम मारहाण केली. यावेळी बराच गदारोळ झाला.
या घटनेची माहिती मिळताच राणीपूर आणि महंमदाबाद गोहाना पोलिस ठाण्याचे पोलिस पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. बाजारात गोंधळ घालणाऱ्या अर्धा डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक पोलीस ठाण्यात पोहोचले. तर, दुसरीकडे खुरहाट बाजाराजवळ प्रियकर- प्रेयसीच्या भेटीदरम्यान झालेल्या प्रचंड गदारोळामुळे दिवसभर बाजारात गोंधळ उडाला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खुरहाट बाजारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महंमदाबादचे सर्कल ऑफिसर गोहाना शीतला प्रसाद पांडे यांनी सांगितले की, याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मउच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, राणीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरहाट पोलीस चौकीजवळ प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमप्रकरणावरून दोन गावातील लोकांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या