थंडीपासून वाचण्यासाठी घरात शेगडी पेटवली; कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू-uttar pradesh 5 members of same family suffocate to death while sleeping in their house in amroha ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  थंडीपासून वाचण्यासाठी घरात शेगडी पेटवली; कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू

थंडीपासून वाचण्यासाठी घरात शेगडी पेटवली; कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू

Jan 10, 2024 02:00 PM IST

5 members of Same family Suffocate Death: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

5 Members Death Same Family
5 Members Death Same Family

Uttar Pradesh Amroha Suffocate Death: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घरात झोपलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला, इतर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित कुटुंबाने थंडीरपासून वाचण्यासाठी घरात कोळशाची शेगडी पेटवली होती, ज्यामुळे त्यांचा श्वास गुदमरला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण, त्यांनी घरात कोळशाचा ब्रेझियर जाळला होता. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन घेण्यास समस्या निर्माण झाली असेल, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, मंगळवारी या कुटुंबाने दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता कुटुंबातील सगळेच बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडले होते. यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर, दोघांची प्रकृती चिंताजनक होती. या दोघांनना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एकाच घरातील ५ जण मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. प्राथमिक तपासानुसार, सदर कुटुंबाने थंडीपासून वाचण्यासाठी कोळशाची शेगडी पेटवल्याची माहिती मिळाली. ज्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. इतर दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत कुटुंबाने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता ही घटना उजेडात आली. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Whats_app_banner
विभाग