TRAI News : आज काल एकाच फोनमध्ये दोन सीम वापरणे हे सर्वसामान्य झाले आहे. मात्र, आता हे दोन सीम वापरणे तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये दोन सीमकार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ट्रायने दोन सिमबाबत प्रस्ताव तयार केला आहे. एका फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांवर आता दंड आकारण्यात येणार आहे.
आज काल नागरिक सर्वसामान्यपणे दोन सिमकार्डचा वापर करतात. मोबाइल कंपन्यांनी देखील फोनमध्ये दोन सीमची व्यवस्था केली आहे. याचा फायदा नागरिक घेत आहे. पण दोन सीमकार्ड वापरण्याबाबत ट्रायने नियमात बदल केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने दोन सिम संदर्भात एक नवा प्रस्ताव तयार केला आहे. एकाच फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांवर ट्राय दंड आकारणार आहे. नंबरचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर काळजी घ्यावी लागणार आहे.
काही लोक कोणत्याही गरजेशिवाय त्यांच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड ठेवतात. ET च्या एका नवीन अहवालानुसार ट्राय लवकरच सिम कार्ड नियम बदलू शकते. ट्रायचे मत आहे की जर कोणी फोनमध्ये दोन सिमकार्ड गरज नसतांना वापरत असेल तर त्याच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले पाहिजे. हे शुल्क मासिक किंवा वार्षिक असू शकते.
याचा अर्थ, जर तुम्ही एकच सिम वापरत असाल आणि तुमच्या फोनमध्ये दोन सिम इन्स्टॉल असतील तर तुम्हाला लवकरच अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात २१९ दशलक्षाहून अधिक मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत. हे मोबाईल क्रमांक काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत.
ट्रायच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोक दोन सिमकार्ड ठेवतात. एक सक्रियपणे वापरासाठि तर दुसरा चालू ठेवण्यासाठी. जर लोकांनी एकच नंबर किंवा एकच सिम ठेवले तर टेलिकॉम कंपन्यांना नंबरची कमतरता भासणार नाही. ट्रायच्या म्हणण्यानुसार जगातील अनेक देशांमध्ये एक सिमकार्डचा नियम लागू आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलंड, ब्रिटन, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बल्गेरिया, कुवेत, नेदरलँड, स्वित्झर्लंड, पोलंड, डेन्मार्क या देशांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या