अमेरिकेत एक आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. येथे एक महिला पाच वर्षे कोम्यात राहिल्यानंतर शुद्धीत आली आहे. महिला कोम्यात असताना तिची आई तिला विनोदी चुटकुले ऐकवत होती. एका दिवशी आपल्या आईच्या विनोदावर हसत-हसत ती कोम्यातून बाहेर आली. मिशिगनमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव जेनिफर फ्लेवेलेन आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये एका कार अपघातात ती जखमी होऊन कोम्यात गेली होती. रुग्णालयात उपाचारादरम्यान ती हळू-हळू बरी होत होती. महिला शुद्धीवर आल्यानंतर तिचे नातेवाईक खुप आनंदीत आहेत. डॉक्टरांनी हा चमत्कार असल्याचे म्हटले आहे.
जेनिफरची आई पेगी मीन्स यांनी एका मुलाखतीत म्हटले की, ती कोम्यातून बाहेर आल्यानंतर मला खूप भीती वाटली होती. ती मोठ-मोठ्याने हसत उठली. याआधी तिने असे केले नव्हते. आपली मुलगी बरी झाल्याने पेगी मीन्स खूप आनंदित व भावुक आहे. त्यांनी म्हटले की, आमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान महिलेचा पती मागील पाच वर्षापासून कोमा दरम्यान तिची काळजी घेत आहे. जेनिफरच्या आईने सांगितले की, ती उठली आहे मात्र अजूनपर्यंत ती बोलत नाही. मात्र डोकं हलवून ती उत्तरे देत आहे. पहिल्यांदा ती खूप वेळ झोपत असे.
जेनिफर शुद्धीवर आल्यामुळे डॉक्टरही खुप आनंदित व आश्चर्यचकीत झाले आहेत. मिशिगनमधील मेरी फ्री बेड रिहॅबिलिटेशन हॉस्पिटलमधील फिजिशियन डॉक्टर राल्फ वँग यांनी म्हटले की, ती केवळ उठली नाही तर बरी झाली आहे. त्यांनी म्हटले की, हे खूपच दुर्मिळ प्रकरण आहे. केवळ एक ते दोन टक्के रुग्ण कोम्यातून बरे होतात. कोम्यातून बरी झाल्यानंतर जेनिफर आपला मुलगा जूलियनचा फुटबॉल सामनाही पाहायला गेली होती. जेव्हा ती कोम्यात गेली होती. तेव्हा तिचा मुलगा ११ वर्षाचा होता.
संबंधित बातम्या