Viral News : मुलाला वंशाचा दिवा समजले जाते. आपल्याला मुलगा व्हावा व आपला वंश वाढवावा अशी अनेकांची इच्छा असते. भारतात मुलासाठी अनेक गैरप्रकार देखील होत असतात. बऱ्याचदा तर गर्भलिंग निदान चाचणी करून मुलगा आहे की मुलगी हे देखील पहिले जाते. तर अनेकदा मुलगा व्हावा यासाठी वाट देखील पाहिली जाते. अमेरिकेत मात्र, काहीसे उलटे चित्र आहे. एका महिलेने मुलीच्या प्रतीक्षेत तब्बल ९ मुलांना जन्म दिला आहे. ९ मुलांच्या जन्मानंतर तिला मुलगी झाली आहे. तिची मुलीची इच्छा पूर्ण झाल्याने तिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
महिलेने तिच्या मुलीसोबतचा फोटो तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला व अल्पावधीत हा फोटो व तिची गोष्ट ही व्हायरल झाली. मुलीच्या जन्मामुळे महिलेच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आपल्या कुटुंबात मुलीचा समावेश व्हावा अशी या कुटुंबाची नेहमीच इच्छा होती आणि आता त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या ३१ वर्षीय यालान्सियाने आपल्या मुलीच्या जन्मापूर्वी ९ मुलांना जन्म दिला. मुलगी होण्याची तिची इच्छा तिच्या नवव्या गरोदरपणानंतर पूर्ण झाली झाहे. तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यातील एक मुलगी आहे. तिची मुलीची इच्छा पूर्ण झाल्यावर अनेकांना ती थांबेल असे वाटले. मात्र, तिने आता तिच्या मुलीला आणखी एक बहीण असावी यासाठी आता यालान्सियाची पुन्हा एकदा आई होण्यास इच्छुक आहे.
या कुटुंबाच्या कथेने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली आहेत. अनेकांनी त्यांना शुभेच्छा संदेशही दिले आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी यालान्सिया पहिल्यांदा आई झाली जेव्हा तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, जो आता १३ वर्षांचा आहे. त्यानंतर यालान्सियाने आणखी 9 मुलांना जन्म दिला असून ती पुन्हा एकदा आई बनणार आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल अभिनंदन केले तर अनेकांनी मुलांच्या संगोपनाची चिंताही व्यक्त केली.
संबंधित बातम्या