Viral news : अमेरिकेत मतदानाच्या दिवशी लोक इंटरनेटवर काय पाहत होते? याबाबत एक अहवाल पुढे आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार अमेरिकेत ५ नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी सर्वाधिक नागरिक पोर्न व्हिडिओ पाहण्यात व्यस्त होते. एडल्ट वेबसाइट पॉर्नहबने हा अहवाल सादर केला आहे. मतदानादिवशी साईटवर तब्बल ७ टक्के ट्रॅफिक वाढलं होत. विशेष म्हणजे ही सर्वाधिक नोंद निळ्या व लाल अशा दोन्ही राज्यांत झाली आहे. निळे राज्य डेमोक्रॅट्स समर्थक तर लाल राज्य हे स्टेट्स रिपब्लिकन पक्षाचे समर्थन करणारे मानले जातात. अहवालानुसार, पोर्नहब वेबसाइटवर सकाळी ८ ते ९ या वेळेत नागरिकांनी सर्वाधिक पोर्न व्हिडिओ पाहिले.
अमेरिकेच्या निवडणुकीच्या दिवशी पोर्न व्हिडिओ पाहतांना वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी वेगवेगळे कीवर्ड वापरले. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील युजर्सने 'थिक एंड कर्वी' हा किवर्ड सर्च केला. तर कोलोरॅडोमध्ये 'नो नट नोव्हेंबर' हा कीवर्ड सर्वाधिक सर्च केला गेला. फ्लोरिडामध्ये 'मॅगा' हा की वर्ड शोधला गेला. 'मॅगा' हे डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या घोषणेचे संक्षिप्त रूप आहे. ही आकडेवारी ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर पर्यंतची आहे. त्याचबरोबर स्विंग स्टेट्समधील लोकांनीही वेगवेगळ्या कीवर्डचा शोध घेऊन पोर्न व्हिडिओ पाहिले. पॉर्नहबनुसार, वॉशिंग्टन, व्योमिंग, न्यू मेक्सिको, नॉर्थ डकोटा आणि साऊथ डकोटा येथील नागरिकांनी वेगवेगळ्या कीवर्डसह पोर्न व्हिडिओ सर्च केले. मिनेसोटा, आयोवा, मिसौरी, लुईझियाना, इलिनॉय आणि ओहायो येथील नागरिक देखील पोर्न व्हिडिओ पाहण्यात मागे नव्हते. याशिवाय टेनेसी, न्यूयॉर्क, ऱ्होड आयलंड मध्ये नागरिकांनी विविध प्रकारचे पोर्न व्हिडिओ पाहिल्याचे या अहवालात म्हटलं आहे.
पॉर्नहबला अमेरिकेतील १४ राज्यांतील माहिती गोळा करता आला नाही. कारण या राज्यांमध्ये या अॅडल्ट कंटेंट वेबसाईटवर बंदी आहे. अलाबामा, अर्कान्सास, लाढाओ, इंडियाना, कॅन्सास, केंटकी, मिसिसिपी, मोंटाना, नेब्रास्का, नॉर्थ कॅरोलिना, ओक्लाहोमा, टेक्सास, उटाह आणि व्हर्जिनिया या राज्यांचा यात समावेश आहे. मात्र, सायंकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत वेबसाइटवर १६ टक्के घट नोंदविण्यात आली. कारण, रिअल टाइम रिझल्ट पाहण्यासाठी अनेकांनी वेबसाइट पाहणं बंद केलं.