मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  india iran chabahar port pact : भारत इराणमधील चाबहार करारामुळे अमेरिका संतप्त! आर्थिक निर्बंध लादण्याची दिली धमकी

india iran chabahar port pact : भारत इराणमधील चाबहार करारामुळे अमेरिका संतप्त! आर्थिक निर्बंध लादण्याची दिली धमकी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 14, 2024 09:34 AM IST

America angry on india iran chabahar port pact : भारत आणि इराणमधील चाबहार बंदरावरून दोन्ही देशात १० वर्षांचा करार झाला आहे. या बंदराची मालकी ही आता पुढील १० वर्षांसाठी भारताकडे राहणार आहे. या करारामुळे अमेरिका संतप्त झाला आहे. भारतावर अरधिक निर्बंध लादण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे.

भारत आणि इराणमधील चाबहार बंदर विकास करारामुळे अमेरिका संतप्त झाला असून भारतावर निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे.
भारत आणि इराणमधील चाबहार बंदर विकास करारामुळे अमेरिका संतप्त झाला असून भारतावर निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे.

America angry on india iran chabahar port pact : चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत आणि इराणमध्ये सोमवारी मोठा करार झाला. भारताने इराणच्या चाबहार शाहिद बेहेश्ती पोर्ट टर्मिनल संचालित करण्यासाठी १० वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. परदेशात असलेल्या बंदराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी भारताकडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारताचा मध्य आशियाशी व्यापार वाढण्यास मदत होणार आहे. या करारामुळे चीनद्वारे पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर देखील लक्ष ठेवता येणार आहे. भारत आणि इराणमधील या करारामुळे अमेरिकेला मात्र धक्का बसला आहे. या करारामुळे अमेरिका संतप्त झाला असून त्यांनी याचा निषेध केला आहे. तसेच भारतावर आर्थिक निर्बंध लादण्याची धमकी देखील दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १४ जणांचा मृत्यू

गाझा युद्धावरून इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या दिवसांपासून तणाव सुरू आहे. इस्रायलने हवाई हल्ल्यात इराणी कमांडरला ठार केले होते. याचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर हल्ला केला होता. यात इस्रायलचे काही नुकसान झाले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे अमेरिकेने इराणवर ड्रोन उत्पादनाबाबत नवीन निर्बंध लादले होते.

चाबहार बंदर इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात आहे. भारत आणि इराण संयुक्तपणे या बंदराचा विकास करत आहेत. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) आणि इराणची बंदरे आणि सागरी संघटना यांनी सोमवारी जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या बंदरासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली. या बंदराच्या विकाससाठी आयपीजीएल सुमारे १२० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तर २५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज उभारण्यात येणार आहे.

पाऊस पडला, पण पाणी गेलं! मुंबईत पवई येथील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले ?

भारत आणि इराणने शाहिद बेहेश्ती पोर्ट टर्मिनल संचालीत करण्यासाठी इराण सोबत १० वर्षांचा करार केला आहे. चाबहार बंदरामुळे मोठ्या प्रमाणात व्यापराला चालना मिळणार आहे, असे मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणशी करार केल्यानंतर व्यक्त केले. भारत आणि मध्य आशियाशी व्यापारिक संबंध वाढवण्यासाठी या बंदराची मोठी मदत होणार आहे.

जयशंकर म्हणाले, "हे बंदर अद्याप विकसित झालेले नाही. जोपर्यंत १० वर्षांपर्यंतचा करार होत नाही, तोपर्यंत बंदरात गुंतवणूक करणे अवघड आहे. त्यामुळे चाबहारचा बंदराच्या ज्या भागात गुंतवणूक केली जाणार आहे, जो भाग आता या करारामुळे लवकरच विकसित केला जाणार आहे. या बंदरामुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. "आमचा विश्वास आहे की आज त्या भागात कनेक्टिव्हिटी ही मोठी समस्या आहे. चाबहार आपल्याला मध्य आशियाशी जोडेल, असे ते म्हणाले.

Monsoon update : बळीराजासाठी खूशखबर! मान्सूनबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला येणार

अमेरिका का झाला संतत्प ?

चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारानंतर काही तासांतच अमेरिकेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "इराणशी व्यापार कराराचा विचार करणाऱ्या कोणत्याही देशाला आमच्या आर्थिक निर्बंधांना सामोरे जाण्याची भीती असणे गरजेचे आहे असा धमकीवजा इशारा अमेरिकेने भारताला दिला आहे.

यूएस स्टेट डिपार्टमेंटचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले, "इराण आणि भारताने चाबहार बंदराबाबत करार केल्याचे वृत्त आम्हाला माहिती आहे. चाबहार बंदराबद्दल तसेच आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो." तुम्हाला आमच्या परराष्ट्र धोरणाविषयी सांगायचे आहे. इराणसोबत व्यवसाय करणाऱ्याला संभाव्य धोके आणि त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. ते म्हणाले, "मी फक्त सांगेन, कारण ही बाब अमेरिकेच्या हिताशी संबंधित आहे. इराणवर अमेरिकेचे निर्बंध कायम असतांना हा करार करणे योग्य नाही असे देखील ते म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग