अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अन्य देशांतील निवडणुकीहून वेगळी असते. येथे केवळ सामान्य लोक केवळ अवलोकन करत नाहीत की, त्यांचा राष्ट्राध्यक्ष आगामी चार वर्षात अमेरिकेसाठी काय करणार आहे, तर हे सुद्धा पाहिले जाते की, राष्ट्रपती पदासाठी जो उमेदवार समोर आले त्याच्याबाबत सोशल मीडियावर लोक काय मत व्यक्त करत आहेत? सोशल मीडिया इंफ्लुएन्सर्स त्याबद्दल काय म्हणत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्यांनी निवडणूक प्रचार सभा व रॅलींचा धडाका लावला आहे. मात्र यामुळे ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती बनू शकतात का? ट्रम्प राष्ट्रपती होऊ शकतात मात्र यासाठी त्यांना अमेरिकन पॉप गायक टेलर स्विफ्टचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.
हो हे खरे आहे. US Presidential Elections 2024 वर बारीक नजर ठेऊन असलेल्या राजकीय विश्लेषकांचे मानने आहे की, सुपरस्टार टेलरचा पाठिंबा येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो. त्यावर ट्रम्प की बायडेन निवडून येणार हे ठरणार आहे.
एका सर्वेमध्ये समोर आले की, १८ टक्के मतदार अशा उमेदावाराला मत देऊ शकतात ज्यांना ३४ वर्षीय Taylor Swift चा पाठिंबा आहे. अमेरिकेतील ३५ वर्षाहून कमी वयाच्या लोकांमध्ये टेलर स्विफ्ट खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे ती रिपब्लिकन पार्टीचे ट्रम्प असो की डेमोक्रेटचे ८१ वर्षीय जो बायडेन. टेलर ज्याला पाठिंबा देईल त्याचे राजकीय भाग्य चमकण्यावाचून राहणार नाही.
टेलर स्विफ्टच्या लोकप्रियतेने सांस्कृतिक, क्रीडा व अर्थशास्त्रासह अमेरिकेच्या सर्व क्षेत्रावर प्रभाव पाडला आहे. यावेळच्या निवडणुकीत जवळपास ८ दशलक्ष नवीन मतदार असतील. तसेच ४१ दशलक्ष जेन झेड मतदार असतील. ज्यापैकी अनेक सेलेब्रेटी व सोशल मीडियाने प्रभावित होतील.
टेलर स्विफ्टला टाइम पत्रिकेने २०२३ ला 'पर्सन ऑफ द ईयर' घोषित केले होते. ती अशी व्यक्ती आहे, जी आपल्या एका ट्विटने राजकारणाला प्रभावित करू शकते.