Donald Tump Swearing In Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अनेक घोषणा केल्या. देशात होणारी घुसखोरी रोखणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील महागाई आटोक्यात आणणे हे दुसरे प्राधान्य असेल. तर पहिल्या आदेशात त्यांनी अवैध स्थलांतरितांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असून सीमेवर सैनिक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखो बेकायदा स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची घोषणा केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच बेकायदा स्थलांतरितांबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती आणि सरकार आल्यास बेकायदा स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
ट्रम्प म्हणाले, सर्वप्रथम मी दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो. सर्व बेकायदा प्रवेश तात्काळ बंद केले जातील आणि कोट्यवधी गुन्हेगार परदेशी नागरिक जिथून आले त्या ठिकाणी परत पाठवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू. मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, 'मी अमेरिकेला प्रथम स्थान देईन. बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसलेल्या धोकादायक गुन्हेगारांना आधीचया सरकारने आश्रय दिले असल्याचे सांगत ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर टीका केली. अमेरिकेपुढील आव्हाने सोडवण्यास प्राधान्याने पुढाकार घेतला जाईल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या जीव घेण्या हल्ल्याचा उल्लेख करताना म्हटलं की, देवाने मला 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'साठी जीवदान दिले आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या न्याय विभागाचे यापूर्वी झालेले क्रूर, हिंसक आणि अन्यायकारक शस्त्रास्त्रीकरण संपुष्टात आणले जाईल.
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्याने अनेक देशांचे टेंशन वाढलं आहे. प्रामुख्याने चीन आणि कॅनडावर सर्वाधिक व्यापारविषयक निर्बंध डोनाल्ड ट्रम्प लावण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी कॅनडा हा अमेरिकेचे ५२ वे स्टेट होऊ शकतो, त्या बदल्यात त्यांना अनेक सुविधा दिले जातील अशी ऑफर देखील दिली होती. मात्र, ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर कॅनडाच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या