फ्लोरिडामध्ये एका ७० वर्षीय व्यक्तीचा शस्त्रक्रियेच्या गंभीर चुकीमुळे ऑपरेशन टेबलवर मृत्यू झाला. पत्नीसह भाड्याच्या घरात गेलेल्या विल्यम ब्रायनला अचानक पोटात डाव्या बाजुला दुखू लागले. या दाम्पत्याने फ्लोरिडामधील एसेन्शन सेक्रेड हार्ट एमराल्ड कोस्ट रुग्णालयात धाव घेतली. जिथे ब्रायन यांची प्लीहाच्या विकृतीसाठी चाचणी केली गेली.
जनरल सर्जन डॉ. थॉमस शाकनोवस्की, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्रिस्तोफर बाकानी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेची शिफारस केली. इच्छा नसतानाही ब्रायन यांनी शस्त्रक्रियेसाठी संमती दिली. त्यांना विश्वास होता की यामुळे त्यांचा त्रास कमी होईल, मात्र हे ऑपरेशन त्यांच्या जीवावर बेतले.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. शाकनोव्स्की यांनी चुकून प्लीहा (spleen) ऐवजी ब्रायनचे यकृत काढून टाकले, ज्यामुळे अति रक्तस्त्रावामुळे ब्रायन यांचा मृत्यू झाला. ब्रायनची पत्नी बेवर्लीचे वकिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, शल्यचिकित्सकांनी काढून टाकलेल्या यकृताला "वाढलेली प्लीहा" असे लेबल लावून रुग्णालयाने चूक झाकण्याचा प्रयत्न केला.
रिपोर्टनुसार ब्रायनचे यकृत काढताना डॉ. शाकनोव्स्की यांनी प्रमुख रक्तवाहिन्या कापल्या, ज्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. लॉ फर्मचा असा ही आरोप आहे की, शल्यचिकित्सकांनी प्लीहा गंभीर रोगग्रस्त आहे आणि त्याच्या शरीरात स्थलांतरित झाला आहे, असा दावा करून त्या व्यक्तीच्या कुटुंबाची दिशाभूल केली. त्यांनी असेही सुचवले की ब्रायनचा वास्तविक प्लीहा अद्याप त्याच्या पृष्ठभागावर एक लहान अल्सर असलेल्या जागी आहे.
डॉ. शाकनोव्स्की यांना यापूर्वीही अशा चूका केल्या असून चौकशीला सामोरे जावे लागले आहे. लॉ फर्मने सांगितले की, २०२३ मध्ये "चुकीच्या साइट शस्त्रक्रिया" घटनेत सामील होता जिथे त्याने चुकून रुग्णाच्या स्वादुपिंडाचा काही भाग इच्छित अधिवृक्क ग्रंथीऐवजी काढून टाकला होता.
बेवर्ली ब्रायनने पतीच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी करत यासाठी डॉक्टरांना जबाबदार धरण्यात यावे आणि यापुढे ते वैद्यकीय प्रॅक्टिस करू देऊ नयेत, अशी मागणी केली आहे. पतीच्या मृत्यूशी संबंधित दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईचा ती पाठपुरावा करत आहे.
एसेन्शन सेक्रेड हार्ट एमराल्ड कोस्ट हॉस्पिटलने सांगितले आहे की ते या घटनेचा तपास करत आहेत. नॉर्थ वॉल्टन डॉक्टर्स हॉस्पिटल, जे पूर्वी डॉक्टरांशी संबंधित होते, तेव्हापासून त्यांच्यापासून विभक्त झाले आहे.