मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिला पोलीस अधिकाऱ्याचा न्यूड फोटो व्हायरल; आपल्याच विभागाविरोधात दाखल केला खटला

महिला पोलीस अधिकाऱ्याचा न्यूड फोटो व्हायरल; आपल्याच विभागाविरोधात दाखल केला खटला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2024 08:50 PM IST

Viral Photo : महिला पोलीस अधिकाऱ्याचा बॉयफ्रेंडला १२ वर्षापूर्वी पाठवलेला टॉपलेस फोटो व्हायरल झाल्याने तिने आपल्या विभागाविरोधात खटला दाखल केला आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल
महिला पोलीस अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल

न्यूयॉर्क पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याने आपल्याच विभाहाविरोधात खटला दाखल केला आहे. या महिला अधिकाऱ्याचा न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित महिलेने सांगितले की, तिने हा फोटो १२ वर्षापूर्वी आपल्या माजी बॉयफ्रेंड, लेफ्टनंट मार्क रिवेरा  याला पाठवला होता. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार महिला अधिकाऱ्याचे नाव एलिसा बजाराक्तारेविक असे आहे. तिची तक्रार आहे की, या व्हायरल फोटोमुळे तिचे करिअर बर्बाद झाले आहे. ३४  वर्षीय एलिसा हिने मॅनहाट्टन कोर्टात खटला दाखल केला आहे. तिने २०१२ मध्ये पोलीस दल ज्वाईन केले होते.

आपल्या तक्रारीत महिला पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, एलिसा आणि लेफ्टनंट रिवेरा नोकरीत रुजू होण्यापूर्वी एकमेकांना डेट करत होते. आरोप आहे की, रिवेरा याने एलिसाचा टॉपलेस फोटो अन्य कर्मचाऱ्यांसोबत ग्रुपमध्ये शेअर केला होता. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला होता.  एलिसाने  दावा केला आहे की, यूनियन डेलिगेट्सने त्यांना सांगितले होते की, याची तक्रार दाखल करू नये. यूनियनच्या प्रतिनिधींनी एलीसाला सांगितले की, तू पहिली किंवा शेवटची महिला नाहीस, जिच्यासोबत असे घडले आहे. हे फोटो एप्रिल महिन्यात व्हायरल झाले होते. जेव्हा  एलिसाने त्या अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केला, जे त्यावेळी आपला प्रेमी केल्विन हर्नांडेज सोबत फिरत होते. 

एलिसाने या आरोपाचे खंडन केले आहे की, तिचा प्रेमी ड्रग्स विक्री करत होता. हर्नांडेज त्यावेळी अधिकाऱ्यांचा व्हिडिओ बनवत होता. त्यांच्यावर अटक करण्यास विरोध होता. महिला पोलीस अधिकारी अलिसाने दावा केला आहे की, तिचा न्यूड फोटो न्यूयॉर्क पोलीस  डिपार्टमेंटच्या ग्रुप चॅट्स आणि टेक्स्ट मेसेज चेनमध्ये शेअर केला गेला होता. त्यामध्ये तिचे पालकांचे पत्ते आदि व्यक्तीगत माहितीचा समावेश आहे.

IPL_Entry_Point

विभाग