Sarkari Naukri 2024: संघ लोकसेवा आयोग, यूपीएससीने स्पेशालिस्ट ग्रेड ३, असिस्टंट झूलॉजिस्ट, सायंटिस्ट-बी आणि असिस्टंट इंडस्ट्रियल अॅडव्हायजर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यूपीएससीच्या १०० हून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ आहे.
या भरतीअंतर्गत एकूण १२१ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. सहाय्यक औद्योगिक सल्लागार, शास्त्रज्ञ-ब (भौतिक रबर, प्लास्टिक व वस्त्रोद्योग) सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ, स्पेशलिस्ट ग्रेड ३ सह इतर पदे भरली जाणार आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
सहाय्यक औद्योगिक सल्लागार- १, शास्त्रज्ञ-ब (भौतिक रबर, प्लास्टिक व वस्त्रोद्योग)- १, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ- ७, विशेषज्ञ ग्रेड ३ सहाय्यक प्राध्यापक ओटो-राइनो-लॅरिंगोलॉजी (कान, नाक आणि घसा)- ८, स्पेशालिस्ट ग्रेड ३ सहाय्यक प्राध्यापक (स्पोर्ट्स मेडिसिन)- ३, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (पेडियाट्रिक सर्जरी): ३ स्पेशालिस्ट ग्रेड ३ (प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी)- १०, स्पेशालिस्ट ग्रेड ३ ओटो-राइनो-लॅरिंगोलॉजी (कान, नाक आणि घसा)- ११, स्पेशलिस्ट ग्रेड ३ (कार्डिओलॉजी)- ०१, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (त्वचाविज्ञान)- ०९, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (जनरल मेडिसिन)- ३७, स्पेशालिस्ट ग्रेड ३ (प्रसूती आणि स्त्रीरोग)- ३०.
उमेदवार (महिला / एससी / एसटी / बेंचमार्क अपंग उमेदवार वगळता ज्यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे) केवळ २५/- रुपये (रु. पंचवीस) शुल्क एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा त्याद्वारे पाठविणे आवश्यक आहे. कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा / मास्टर / रुपी / क्रेडिट / डेबिट कार्ड / यूपीआय पेमेंट करून शकतात.
संबंधित बातम्या