UPSC Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोगात अनेक पदांसाठी भरती; कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPSC Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोगात अनेक पदांसाठी भरती; कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा

UPSC Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोगात अनेक पदांसाठी भरती; कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा

Published Oct 16, 2023 03:56 PM IST

Jobs 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगात कोणकोणत्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, याची माहिती जाणून घेऊयात.

Job 2023
Job 2023

Government Jobs 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने विशेषज्ञ ग्रेड III सहायक प्राध्यापक, ड्रिलर, जहाज सर्वेक्षक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शनिवारपासून म्हणजेच १४ ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. इच्छुक उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट upsconline.nic वर जाऊन अर्ज करू शकतात. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरती अतंर्गत एकूण २५ पदांची भरती केली जाणार आहे. ज्यात असिस्टेंट डायरेक्टर - २ जागा, असिस्टेंट प्रोफेसर- १२ जागा, असिस्टेंट आर्किटेक्ट- १ जागा, ड्रिलर इन चार्ज- ६ जागा, इंजिनिअर आणि जहाज सर्वेक्षक कम डिप्टी डायरेक्टर जनरल-३ जागा आणि जहाज सर्वेक्षक कम डिप्टी डायरेक्टर जनरल पदाच्या एक जागेचा समावेश आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी केंद्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ७ हजार ५१० पदांची बंपर भरती, जाणून घ्या पात्रता व पगार

निवड प्रक्रिया

या पदासांठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सर्वात प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. यानंतर उमेदवारांची अंतिम यादीत जाहीर केली जाईल.

अर्ज शुल्क

महिला/एसटी/एससी गटातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तर, सामन्य गटातील उमेदवारांकडून २५ रुपये अर्ज शुल्क आकारला जाईल. उमेदवार, नेट बँकिंग किंवा क्रेडीट आणि डेबिट कार्डद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया

- उमेदवारांनी सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर भेट द्यावी

- मुख्यपृष्ठावर गेल्यानंतर 'ऑनलाईन रिक्रुटमेन्ट अप्लिकेशनवर' क्लिक करावी.

- यानंतर उमेदवारांना अर्ज दिसेल, जो लक्षपूर्वक वाचावे.

- मागितलेली सगळी माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावी

- अर्ज शुल्क भरून पुन्हा एकदा फॉर्म वाचा

- त्यानंतर सबमिट करा

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर