UPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ऑनलाइन निकाल पाहण्याच्या स्टेप्स
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ऑनलाइन निकाल पाहण्याच्या स्टेप्स

UPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ऑनलाइन निकाल पाहण्याच्या स्टेप्स

Dec 09, 2024 10:10 PM IST

UPSC CSE Mains Result 2024: यूपीएससीने मुख्य परीक्षा निकाल २०२४ जाहीर केला आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी बसलेले सर्व उमेदवार यूपीएससी upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर (canva)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल २०२४ जाहीर केला आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी बसलेले सर्व उमेदवार यूपीएससी upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाइटवर निकालासह कटऑफ गुण, गुणवत्ता यादी आणि इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ २०, २१, २२, २८ आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत घेण्यात आली.

या भरती मोहिमेच्या माध्यमातून १०५६ पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया १४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि ५ मार्च २०२४ रोजी संपली. पूर्व परीक्षा १६ जून २०२४ रोजी घेण्यात आली होती आणि निकाल १ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आला होता.

UPSC Mains Result 2024: यूपीएससी मुख्य निकाल 2024  चेक करण्याच्या स्टेप्स -

1. सर्वप्रथम तुम्हाला upsc.gov.in. या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल 

2. यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या यूपीएससी मेन्स परीक्षा निकाल 2024 वर क्लिक करावे लागेल.

3. यानंतर तुमच्या स्क्रीनवर रिझल्ट पीडीएफ फाइल ओपन होईल.

4. आता रिझल्ट पीडीएफ फाईलमध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि रोल नंबर तपासावा लागेल.

5. रिझल्ट पीडीएफ फाइल डाऊनलोड करा.

6. भविष्यातील संदर्भासाठी आपल्या निकाल पीडीएफ फाईलची प्रिंट आउट घ्या.

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता मुलाखतीच्या फेरीत उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच मुख्य संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी संघ लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-११००६९ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीची (मुलाखत) तारीख योग्य वेळी कळविली जाईल, जी संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालय, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069 येथे आयोजित केली जाईल. त्यानुसार व्यक्तिमत्त्व चाचणीचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी ई-समन्स लेटर यथावकाश जारी केले जातील, जे उमेदवारांना आयोगाच्या upsc.gov.in आणि upsconline.nic.in अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतील.

व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर अर्ज फॉर्म (डीएएफ-2) भरून सादर करावा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर