विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष

Jul 25, 2024 02:57 PM IST

UPSC Exam news update : दरवर्षी UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसह १४ परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखत देखील भारतीय लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित केली जाते

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीने ठेवणार लक्ष

UPSC Exam news upadate : UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग सध्या मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा देशातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरूणांवर होणार आहे. आयोग यूपीएससी परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे जाहिअर करण्यात आलेले नाही. पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतांना हा निर्णय घेण्याच्या तयारीत आयोग असल्याचं म्हटलं जात आहे. परीक्षेतील फसवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी या पुढे यूपीएससी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची शक्यता आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), चेहऱ्याची ओळख यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

भारतात प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध परीक्षांचे आयोजन करत असते. तब्बल १४ परीक्षा या दरवर्षी घेतल्या जातात. सीएसई म्हणजेच नागरी सेवा परीक्षेचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखतीचे आयोजन देखील यूपीएससी घेत असते.

या सुरक्षा पद्धतीचा होणार वापर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपीएससी आधार आधारित फिंगरप्रिंटिंगवरही विचार करत आहे. याशिवाय एआय तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्याच्या विचारात आयोग आहे. सीसीटीव्ही, ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग यांचाही या नव्या प्रणालीचा समावेश राहणार आहे. परीक्षेत उमेदवाराच्या जागी दूसरा डमी विद्यार्थी बसवून फसवून टाळण्यासाठी व आयोगाची प्रतिमा योग्य ठेवण्यासाठी हे पाऊल आयोग उचलण्याची शक्यता आहे.

सध्या, यूपीएससीने या नव्या बदलांसाठी निविदा मागवल्या आहेत. अशा सेवा देणाऱ्या कंपन्यांना वेळापत्रक, परीक्षा केंद्र आणि किती उमेदवार परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी हजार राहतील, अशी माहिती निविदा कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अशावेळी घडत आहे जेव्हा महाराष्ट्र केडरच्या आयएएस पूजा खेडकर यांच्या निवडीवरून लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

|#+|

काय आहे पूजा खेडकर प्रकरण?

पूजा खेडकर यांच्यावर नॉन क्रीमी लेयर आणि ओबीसी प्रवर्गाचे बनावट प्रमाणपत्र वापरुन आयएएस पद मिळवल्याचा आरोप आहे. याशिवाय खेडकर यांच्या वर्तणुकीबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. व त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. थांनी आयोगाची फसवण केल्याने त्यांचा प्रोबेशन कालावधी रद्द करून त्याची सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यांना मसुरी येथील एलबीएसएनएए या अकादमीमध्ये पुन्हा येण्यास सांगण्यात आले. मात्र, असे असतांना देखील पूजा खेडकर या मंगळवारी आयोगा पुढे हजर राहील्या नाहीत. याशिवाय यूपीएससीनेही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर