मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPSC IFS Main Exam Result: यूपीएससी आयएफएस मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर तपासा मार्क

UPSC IFS Main Exam Result: यूपीएससी आयएफएस मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर तपासा मार्क

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2024 08:30 PM IST

UPSC IFS Main Exam Result Out: यूपीएससीने भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर केला आहे.

UPSC announces Indian Forest Service (Main) Exam 2023 results
UPSC announces Indian Forest Service (Main) Exam 2023 results

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा, २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना upsc.gov.in येथील अधिकृत संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येणार आहे.

आयोगाने आयएफएस मुख्य परीक्षा २०२३ गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर- ०३ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित केली होती. पात्र उमेदवारांनी भारतीय वनसेवा परीक्षा २०२३ च्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.  मुलाखतीच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

परीक्षेच्या नियमावलीतील उपरोक्त तरतुदींनुसार, या सर्व उमेदवारांनी डीएएफ-२ ऑनलाइन भरून सादर करावा, जो १६ जानेवारी २०२४ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत संघ लोकसेवा आयोगाच्या https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील, अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि आयोगाकडून यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. तसेच, अशा उमेदवारांना ई-समन्स पत्र दिले जाणार नाही,' असे अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे.

  •  सर्वात प्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर भेट द्यावी.
  • त्यानंतर भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा निकाल पर्यायावर क्लिक करावे.
  • स्क्रीनवर एक पीडीएफ दिसेल, ज्यात पात्र उमेदवारांची यादी दिसेल.
  •   निकाल पाहिल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट घ्यावी.

WhatsApp channel

विभाग