UPSC CSE 2024 Final Result Declared: यूपीएससी नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. शक्ती दुबे यांनी त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा टॉप १० मध्ये ३ मुलींचा समावेश आहे. तर महराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा आला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल उत्तीर्ण झाली आहे.
नागरी सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि विविध गट अ आणि गट ब केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. हर्षिता गोयल यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय आयुषी बन्सल टॉप १० मध्ये मुलींमध्ये ७ व्या स्थानावर आहे. टॉप ५ मध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
शक्ती दुबे यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे ऐच्छिक विषय घेतले. ते अलाहाबाद विद्यापीठातून बीएस्सी बायोकेमिस्ट्रीपदवीधर आहेत. त्यांनी बनारसमधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ती २०१८ पासून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती. हर्षिता गोयल यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा ऐच्छिक विषय घेऊन दुसरा क्रमांक पटकावला. बडोदा येथील एमएस विद्यापीठातून त्यांनी B.Com केले आहे. अर्चित डोंगरे,पराग हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचे पदवीधर आहेत. चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या शाह मार्गी चिराग आणि आकाश गर्ग यांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
एकूण १००९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य प्रवर्गातील आहेत. ईडब्ल्यूएसचे १०९, ओबीसीचे ३१८, एससीचे १६० आणि एसटीचे ८७ आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी मुलाखती १७ एप्रिल २०२५ पर्यंत घेण्यात आल्या होत्या. मुलाखतफेरी ७ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाली. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमारे २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते.
रँक, रोल नंबर आणि नाव
1 0240782 शक्ती दुबे
2 0101571 हर्षिता गोयल
3 0867282 डोंगरे अर्चित पराग
4 0108110 शाह मार्गी चिराग
5 0833621 आकाश गर्ग
6 0818290 कोमल पुनिया
7 6902167 आयुषी बन्सल
8 6613295 राज कृष्ण झा
9 0849449 आदित्य विक्रम अग्रवाल
10 5400180 मयंक त्रिपाठी
11 8200949 एट्टाबायना साई शिवानी
संबंधित बातम्या