Digital Payment Security: यूपीआय पेमेंट (UPI Payment) हे भारतातील डिजिटल व्यवहारांसाठी (Online Payment) एक आवश्यक साधन बनले आहे, जे दररोज लाखो वापरकर्त्यांना सेवा पुरवते. यूपीआयवर देखरेख ठेवणाऱ्या नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणजेच एनपीसीआय (NPCI) अहवालानुसार, देशभरातील विविध यूपीआय प्लॅटफॉर्मवर अब्जावधी रुपयांच्या व्यवहारांवर प्रक्रिया केली जाते. लवकरच ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुरक्षित होऊ शकतात. कारण एनपीसीआय यूपीआय प्रणालीमध्ये फेस आयडी (Face ID) किंवा फिंगरप्रिंट सेन्सर (Fingerprint Sensor) सारख्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनपीसीआय यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक पडताळणी पद्धती लागू करण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआय डिजिटल व्यवहारांमध्ये अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी पर्यायी पद्धतींचा शोध घेण्याच्या नुकत्याच केलेल्या प्रस्तावानंतरहे पाऊल उचलण्यात आले आहे. आरबीआयने सुचवले आहे की, वाढीव सुरक्षेसाठी बायोमेट्रिक पर्यायांसह पारंपारिक पिन आणि पासवर्डच्या पलीकडच्या पद्धतींचा विचार केला जावा.
एनपीसीआयची स्टार्टअप्सशी सध्याची चर्चा संभाव्य भागीदारीच्या आर्थिक आणि कायदेशीर पैलूंवर लक्ष केंद्रित करते. सुरुवातीला, पिन-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण दोन्ही पद्धती वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे, ज्यामुळे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.
या विकासामुळे वापरकर्त्यांना अँड्रॉइड डिव्हाइसवरील फिंगरप्रिंट सेन्सर किंवा आयफोनवरील फेस आयडी सारख्या त्यांच्या स्मार्टफोनवरील बायोमेट्रिक वैशिष्ट्यांचा वापर करून यूपीआय पेमेंटची पडताळणी करण्याची परवानगी मिळू शकते. यूपीआय व्यवहारांशी संबंधित घोटाळ्यांच्या वाढत्या संख्येच्या चिंतेमुळे बायोमेट्रिक्सकडे वळले आहे, कारण अनेकदा वापरकर्त्यांच्या पिनचा वापर करून त्यांची फसवणूक केली जाते. यूपीआय हा व्यवहार सुरक्षित असूनही हा व्यवहार आणखी सुरक्षित करण्यासाठी एनपीसीआय मोठे पाऊल उचलत आहे.
यूपीआय पेमेंटसाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुरू करणे, हे फसवणूक कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मात्र, हे फीचर केव्हा उपलब्ध होईल याची कालमर्यादा अस्पष्ट असून कोणते यूपीआय अॅप्स याला सपोर्ट करतील याची शाश्वती नाही. गुगल पे, फोनपे, अॅमेझॉन पे आणि पेटीएम सारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्म बाजारात आघाडीवर असल्याने, तंत्रज्ञान विकसित होत असताना वापरकर्त्यांना पिन किंवा बायोमेट्रिक्सपैकी एक निवडण्याचा पर्याय मिळेल, असा अंदाज आहे.