Upcoming Smartphones in India: स्मार्टफोन निर्माता कंपनी ऑनर लवकरच भारतीय बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी ऑनर कंपनीचा २०० मेगापिक्सल असलेला स्मार्टफोन ऑनर ९० भारताच लॉन्च झाला होता. दरम्यान, कंपनीचे हेड माधव शेठने ऑनरच्या आगामी स्मार्टफोनचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये फोनचा ड्रॉप टेस्ट केली जात आहे. या टीझरद्वारे फोनच्या डिस्प्लेची ड्युरेबिलिटी पाहिली जाऊ शकते.
टीझरमध्ये फोनचे नाव सांगण्यात आले नाही. परंतु, पोस्टमध्ये एक्सचा वापर करण्यात आल्याने हा फोन ऑनर एक्स ९ बी असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ड्रॉप टेस्टमध्ये फोनला वेगवेगळ्या उंचीवरून खाली पाडण्यात आले. मात्र, फोनच्या डिस्प्लेला काहीच झाले नाही.ऑनर कंपनीचा हा फोन चीनमध्ये लॉन्च झाले आहे. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि चांगले फीचर्स देण्यात आले.
कंपनी या फोनमध्ये १.५ K रिझोल्यूशनसह ६.७८ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देत आहे, जे १२० Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन १२ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज पर्यायासह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Adreno 710 GPU सह Snapdragon 6 Gen 1 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन ५ हजार ८०० मेगापिक्सल बॅटरीसह येतो, जी ३५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 13 वर आधारित Magic UI 72 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.1 आणि GPS सारखे पर्याय मिळत आहेत.