Bajaj Pulsar: बजाजनं स्पर्धेक कंपन्यांचं टेन्शन वाढवलं, पल्सर एनएस २०० आणि एनएस १६० उतरवली बाजारात!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bajaj Pulsar: बजाजनं स्पर्धेक कंपन्यांचं टेन्शन वाढवलं, पल्सर एनएस २०० आणि एनएस १६० उतरवली बाजारात!

Bajaj Pulsar: बजाजनं स्पर्धेक कंपन्यांचं टेन्शन वाढवलं, पल्सर एनएस २०० आणि एनएस १६० उतरवली बाजारात!

Published Feb 17, 2024 12:53 PM IST

बजाज ऑटोने २०२४ पल्सर एनएस २०० आणि पल्सर एनएस १६० लॉन्च केली आहे. या दोन्ही बाईकमध्ये ग्राहकांना खास फीचर्स मिळणार आहेत.

Bajaj Pulsar New Bikes
Bajaj Pulsar New Bikes

Bajaj Pulsar New Bikes: बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत २०२४ पल्सर एनएस २०० आणि पल्सर एनएस १६० चे अनावरण केले आहे. ब्रँडने नवीन पल्सरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु सध्याच्या मॉडेल्सपेक्षा त्यांची किंमत थोडी जास्त असण्याची अपेक्षा आहे. बजाजच्या एनएस पल्सर बाईकला बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे बजाजने नवीन अपडेटसह पल्सर एनएस २०० आणि पल्सर एनएस १६० बाजारात दाखल केली आहे, ज्याची दिर्घकाळापासून ग्राहकांमध्ये उस्तुकता पाहायला मिळत आहे.

मोटारसायकलच्या २०२४ च्या व्हर्जनमध्ये एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्ससह एलईडी हेडलॅम्प देण्यात येणार आहे. पल्सर एनएस २०० आणि पल्सर एनएस १६० मध्ये सुरुवातीपासूनच हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आला होता. बजाज ऑटोने केलेला दुसरा बदल म्हणजे नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर ज्याने प्रथम पल्सर एन १६० आणि पल्सर एन १५० वर पदार्पण केले. नवीन डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टरब्लॅक-आऊट इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येईल, जे डाव्या स्विच गिअरवरील बटणाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. नवीन क्लस्टरमध्ये गिअर पोझिशन इंडिकेटर, मोबाइल नोटिफिकेशन अलर्ट, तात्कालिक इंधन इकोनॉमी, अंतर, सरासरी इंधन इकोनॉमीआणि वेळ अशी माहिती दर्शविली जाते. याशिवाय नेहमीचे ट्रिप मीटर, ओडोमीटर, स्पीडोमीटर आणि फ्यूल गेज असणार आहे.

बाईकमधून अ‍ॅनालॉग टॅकोमीटर आता काढून टाकण्यात आला आहे आणि त्याची जागा आडव्या बाजूला ठेवलेल्या नवीन डिजिटल युनिटने घेतली आहे. तसेच बाईकला चालवताना कॉलस्वीकारता आणि रिजेक्ट करता येणार आहे. मोटारसायकल आणि मोबाइल फोन जोडण्यासाठी बजाज राइड कनेक्ट अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. याशिवाय एक नवीन यूएसबी पोर्ट आहे, ज्याचा वापर मोबाइल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो.

ब्रँडने मोटरसायकलमध्ये कोणतेही यांत्रिक बदल केलेले नाहीत. तर, पल्सर एनएस २००  ९ हजार ७५० आरपीएमवर २४.१६ बीएचपी पॉवर आणि ८ हजार आरपीएमवर १८.७४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पल्सर एनएस १५० ९ हजार  आरपीएमवर १६.९६ बीएचपी पॉवर आणि ७ हजार २५० आरपीएमवर १४.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर