Mother Threw Her 9-Month-Old Child: उत्तर प्रदेशच्या बलियामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बहिणीला फसवण्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या ९ महिन्याच्या निष्पाप मुलाला छतावरून खाली फेकले. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या कृष्णा नगर भागात घडली. गोलू गोंड यांची ३५ वर्षीय पत्नी अंजू देवी आपल्या माहेरी कृष्णा नगरमध्ये राहते. त्याची बहीण मनीषा देवीही येथे राहते. दोन्ही बहिणींमध्ये अनेकदा वाद होत असतात. शनिवारी सकाळी बहिणीशी झालेल्या वादात अंजूने आपल्या ९ महिन्यांच्या नवजात मुलाला छतावरून फेकून बहिणीवर तिच्यावर हत्येचा आरोप करत आरडाओरडा सुरू केला. अंजूची आई शोभा देवी यांनी पोलिसांना फोन करून आपल्या मुलीने आपल्या नऊ महिन्यांच्या नातवाचा हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी अंजूला ताब्यात घेऊन बाळाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.
मुलाची आजी शोभा देवी यांच्या तक्रारीवरून अंजूविरुद्ध बीएनएसच्या कलम १०५ (खून न करता सदोष मनुष्यवधाची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू देवी हिचा प्रेमविवाह झाले होते आणि ती गेल्या दोन वर्षांपासून तिच्या आईसोबत तिच्या घरी राहत होती. अंजूची मोठी बहीण मनीषा देखील गेल्या दोन महिन्यांपासून त्याच घरात राहत होती. मात्र, किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वाद होत असे. शवविच्छेदनचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील. एखादी महिला बहिणीसोबत झालेल्या किरकोळ वादातून वादातून पोटच्या मुलाची हत्या कशी करू शकते? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजस्थानमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली, जिथे दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणीने आपल्या प्रियकराची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिची आणि नव्या प्रियकराला अटक केली. राजस्थानमधील अलवरमध्ये एका मुलीने नव्या मुलाच्या प्रेमात पडल्यानंतर जुन्या प्रियकराला मार्गावरून हटवण्यासाठी असा चुकीचा मार्ग निवडला. हे प्रकरण बहरोड शहरातील आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या