उत्तर प्रदेशात दहशत माजवणाऱ्या माफियांचा भयानक शेवट! मुख्तारसह ९ अट्टल गुन्हेगारांचा भयानक झाला मृत्यू-up nine mafia and deadly criminals including mukhtar have died in custody here detail ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  उत्तर प्रदेशात दहशत माजवणाऱ्या माफियांचा भयानक शेवट! मुख्तारसह ९ अट्टल गुन्हेगारांचा भयानक झाला मृत्यू

उत्तर प्रदेशात दहशत माजवणाऱ्या माफियांचा भयानक शेवट! मुख्तारसह ९ अट्टल गुन्हेगारांचा भयानक झाला मृत्यू

Mar 30, 2024 10:49 AM IST

Mukhtar Ansari Death : उत्तर प्रदेशातील माफिया आणि अट्टल गुन्हेगारांची भीती आता वास्तवात बदलत आहे. अतिक अहमद ते मुख्तार अन्सारी यांनी त्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली होती. एकाची हत्या तर दुसऱ्याचा जेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. आतापर्यंत ही ९ अट्टल बाहुबली गुन्हेगारांचा भयानक शेवट झाला आहे.

दहशत माजवणाऱ्या माफियांचा भयानक शेवट! मुख्तारसह ९ अट्टल गुन्हेगारांचा भयानक झाला शेवट
दहशत माजवणाऱ्या माफियांचा भयानक शेवट! मुख्तारसह ९ अट्टल गुन्हेगारांचा भयानक झाला शेवट

Uttar Pradesh Criminl death : उत्तर प्रदेशात गेली सात वर्षे कुख्यात माफिया आणि कुख्यात बाहुबली गुन्हेगारांचा काळ ठरला आहे. मुख्तार अन्सारी, मुन्ना बजरंगी यांच्यासह ज्या माफियांनी मृत्यूपूर्वी मारले जाण्याची भीती व्यक्त केली, ती खरी ठरली आहे. एकतर ते त्यांच्या शत्रूच्या गोळीला बळी पडले तर कही पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. तर काहींचा आजारपणामुळे जेलमध्येच मृत्यू झाला. गेल्या सात वर्षांत माफिया मुख्तार अन्सारीसह नऊ माफिया उत्तर प्रदेशात ठार झाले आहे.

मुन्ना बजरंगी

मुन्ना बजरंगी
मुन्ना बजरंगी

या यादीत पहिले नाव आहे पूर्वांचलच्या कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीचे. मुन्ना बाजरंगी माफिया मुख्तार अन्सारीचा खास माणूस होता. ९ जुलै २०१८ रोजी बागपत तुरुंगात त्याची हत्या होण्यापूर्वी मुन्ना बजरंगीच्या कुटुंबीयांनी त्याच्या हत्येची भीती व्यक्त केली होती. या संदर्भात मुन्नाची पत्नी सीमा सिंह यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषदही घेतली.  मुन्नाच्या कुटुंबीयांची भीती तीन दिवसांनी खरी ठरली. गुन्हेगारीच्या एका प्रकरणात त्याला झाशी तुरुंगातून बागपत तुरुंगात नेत असतांना मुन्नाची तेथे पोहोचल्यानंतर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

संजीव माहेश्वरी उर्फ ​​जीवा

संजीव माहेश्वरी उर्फ ​​जीवा
संजीव माहेश्वरी उर्फ ​​जीवा

असाच काहीसा प्रकार पश्चिम यूपीतील कुख्यात माफिया संजीव माहेश्वरी उर्फ ​​जीवासोबत देखील घडला. जीवा कोर्टात हजर होणार होता, त्याच्या जीवाला धोका असून पुरेशी सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी त्याने केली होती. ७ जून २०२३ रोजी, लखनऊमध्ये कोर्टात जात असतांना गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली.

मुख्तार अन्सारी

मुख्तार अन्सारी
मुख्तार अन्सारी

माफिया मुख्तार अन्सारी याने देखील आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचे २१ मार्च रोजी न्यायालयासमोर सांगितले होते. त्याच्या जेवणात स्लो पॉईझन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला.  दरम्यान, आठवडाभरातच मुख्तारची शंका खरी ठरली. शुक्रवारी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने कोठडीत असतांना मृत्यू झाला.  मात्र,  त्याने २१ मार्च रोजी त्यांनी केलेल्या आरोपाने विरोधी पक्षांना अडचणीत आणले आहे.

विकास दुबे

विकास दुबे
विकास दुबे

गेल्या सात वर्षांत यूपीतील बिकारू घटना आणि डेप्युटी एसपीसह आठ पोलिसांच्या हत्येतील मुख्य आरोपी विकास दुबे याचाही कोठडीत मृत्यू झाला. विकास दुबेने पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. बिकारू हत्याकांडानंतर विकास दुबेचा संपूर्ण उत्तर प्रदेश  पोलिस शोध घेत होते, तेव्हा त्याने उज्जैनमधील महाकाल मंदिराजवळ आत्मसमर्पण केले. दरम्यान, उज्जैनहून कानपूरला त्याला परत आणत असताना पोलिसांची  गाडी उलटली. यावेळी  त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,  पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याला ठार मारण्यात आले. 

अतिक आणि अश्रफ

अतिक आणि अश्रफ
अतिक आणि अश्रफ

पोलिसांच्या कोठडीत असणाऱ्या प्रयागराज येथील माफिया बंधू अतिक अहमद आणि अशरफ यांची देखील हत्या करण्यात आली होती. अतिक आणि त्याच्या भावाने उत्तर प्रदेशात मोठी दहशत निर्माण केली होती. उमेश पाल खून झाल्यावर  दोघांनाही अहमदाबाद आणि बरेली येथून प्रयागराज येथे आणण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी  त्यांचा मुलगा असदला चकमकीत ठार मारले होते. या घटनेच्या दोन दिवसांनंतर, अतिक आणि अश्रफ यांना रुग्णालयात नेत असताना तिघा  हल्लेखोरांनी पोलिस ठाण्यासमोर दोघांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. 

खान मुबारक

खान मुबारक
खान मुबारक

आंबेडकरनगरचा कुख्यात माफिया खान मुबारक याचाही न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तो आजारी होता. खान मुबारक मृत्यूसमयी हरदोई तुरुंगात होता. जेथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मेराज आणि मुकीम

 

मेराज आणि मुकीम
मेराज आणि मुकीम

मुख्तारचा जवळचा सहकारी मेराज आणि कुख्यात मुकीम काला, पश्चिम यूपीला पलायन करणारा मुख्य आरोपी देखील पोलिस कोठडीत मरण पावला. चित्रकूट तुरुंगात बंदिस्त असलेल्या मेराज आणि मुकीम काला यांची कुख्यात अंशू दीक्षितने गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र, नंतर अंशू दीक्षितलाही पोलिसांनी चकमकीत मारले.

Whats_app_banner
विभाग