Viral News : पतीसह प्रियकरालाही सोबत ठेवण्यासाठी तीन लेकरांची आई हट्टाला पेटली अन् विजेच्या खांबावर चढली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : पतीसह प्रियकरालाही सोबत ठेवण्यासाठी तीन लेकरांची आई हट्टाला पेटली अन् विजेच्या खांबावर चढली

Viral News : पतीसह प्रियकरालाही सोबत ठेवण्यासाठी तीन लेकरांची आई हट्टाला पेटली अन् विजेच्या खांबावर चढली

Apr 04, 2024 04:06 PM IST

Viral News : महिलेने आपल्या पतीकडे मागणी केली होती की, तिचा प्रियकरही तिच्यासोबत घरात असावा, ही मागणी पतीने फेटाळल्यानंतर महिला चक्क विजेच्या खांबावर चढली..

तीन लेकरांची आई प्रियकरासाठी हट्टाला पेटली अन् विजेच्या खांबावर चढली
तीन लेकरांची आई प्रियकरासाठी हट्टाला पेटली अन् विजेच्या खांबावर चढली

शोले चित्रपटात बसंतीसाठी वीरू पाण्याच्या टाकीवर चढला होता. मात्र उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूरमध्ये 'बसंती' आपल्या 'वीरू' साठी विजेच्या खांबावर चढली. विशेष म्हणजे ही  'बसंती'  सिंगल नाही तर विवाहित महिला असून तिला तीन मुलेही आहेत. तिने आपल्या पतीकडे मागणी केली होती की, तिचा प्रियकरही तिच्यासोबत घरात असावा, ही मागणी पतीने फेटाळली होती.

हा प्रकार गोरखपूरमधील पिपराइच पोलीस ठाणे परिसरातील आहे. येथे बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक महिला घरातून बाहेर पडली व विजेच्या खांबावर चढली. त्यानंतर तेथे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच तेथे बघ्यांची गर्दी झाली. तीन मुलांच्या आईचा एका तरुणावर जीव जडला. त्याला आपल्या घरातच ठेवण्याची तिची इच्छा होती. मात्र पतीने याला विरोध केला. त्यानंतर नाराज होऊन ती विजेच्या खांबावर चढली. तिने पोलवर चढून ११ हजार केवीएच्या हायटेंशन वायरला घट्ट पकडले. त्यामुळे वीज खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ ठरला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले व त्यांनी महिलेची समजूत काढून तिला खाली उतरवले.

प्रियकराला घरात ठेवण्याचा हट्ट करत होती महिला –

स्थानिक लोकांनी सांगितले की, ३४ वर्षीय या महिलेचे एक तरुणासोबत सूत जुळले होते. यामुळे तिचा पतीसोबत नेहमी वाद होत होता. महिलेच्या पतीचे नाव राम गोविंद असून त्यांचे वय ३५ वर्षे आहे. ते मजुरी करून आपले घर चालवत होते. या महिलेचा हट्ट होता की, पतीने तिच्या प्रियकरालाही घरात ठेवावे. याचे वाद रस्त्यावर उतरला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला विजेच्या खांबावर चढल्याचे समजताच पोलीस व वीज विभागचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी महिलेची समजूत काढून खाली उतरवले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पिपराइच पोलीस ठाणे प्रभारी अमित शर्मा यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिला विजेच्या खांबावर चढली होती. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला खाली उतरवले. महिला सुरक्षित असून तिला पतीसोबत पाठवण्यात आले आहे..

महिलेने यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न –

सांगितले जात आहे की, एक महिन्याआधी या महिलेने बीआरडी मेडिकल कॉलेजच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिचा जीव वाचवला होता. त्याआधी महिलेने रेल्वे ट्रॅकवर झोपून तसेत विष पिऊनही जीव देण्याचा प्रयत्न केला होता.

महिलेच्या पतीची पोलिसात तक्रार - 

महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जर त्याच्या पत्नीने अशा प्रकारचे पाऊल उचलले गेले तर त्याला ते जबाबदार राहणार नाहीत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर