Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून मैत्री करून भेटायला बोलावून लोकांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्या टोळीत अनेक महिला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
अखिलेश अहिरवार (वय, ३०), सतीशसिंग बुंदेला (वय, २७) आणि किरण (वय, ३५) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या टोळीत अनेक महिला आहेत, ज्या ब्लाइंड डेटच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करतात आणि त्यांना भेटायला बोलवून त्यांचे अपहरण करतात. तसेच त्यांच्या पालकांकडून खंडणी मागतात. अशा लोकांपासून सावध राहण्याचे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
ललितपूरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद मुश्ताक यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, पीडित लल्लू चौबे (वय, ५०) याची आरोपींच्या टोळीतील एका महिलेशी ओळख झाली. यानंतर महिलेने त्याला शुक्रवारी भेटण्यासाठी झाशी येथे बोलावून घेतले. चौबे घटनास्थळी गेला असता महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्याचे अपहरण करून त्याच्याकडे लाख रुपयांची खंडणी मागितली. चौबेने आपले अपहरण झाल्याची माहिती आपल्या पालकांना दिली. यानंतर चौबेच्या वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चौबेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली. आरोपींचे ठिकाण समजल्यानंतर एका पोलीस कॉन्स्टेबल चौबेचे वडील असल्याचे भासवत खंडणी देण्यासाठी गेले. यानंतर पोलिसांनी छापा टाकून चौबे यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यापैकी एक महिला आहे. चौकशीत त्यांच्या टोळीत अनेक महिला आहेत, ज्या खंडणीसाठी तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवतात.
पंजाब नॅशनल बँकेत पदव्युत्तर बँक अधिकारी लोकेशनाथ श्रीवास्तव यांनी लॅपटॉपचा तुटलेला डिस्प्ले बदलण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर डायल केला. मात्र, त्यानंतर त्यांच्या खात्यातून ७ लाख रुपये गायब झाले. याप्रकरणी त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा बँक अधिकारी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील करजा येथील पाकडी येथील वास्तुविहार कॉलनीत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक अधिकाऱ्याने कंपनीच्या मुझफ्फरपूर येथील सर्व्हिस सेंटरची माहिती घेण्यासाठी त्यांनी गुगलकडून कस्टमर केअर टोल फ्री नंबर डायल केला. हा नंबरच दुसऱ्या मोबाइल नंबरवर ट्रान्सफर करण्यात आला. या नंबरवरील एका व्यक्तीने कंपनीचे सर्व्हिस सेंटर मुझफ्फरपूरमध्ये नसल्याचे सांगून पत्ता विचारला. त्यानंतर समोरील व्यक्तीने बँक अधिकाऱ्याला त्याच्या खात्यात पाच रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. इंजिनीअर घरी जाऊन लॅपटॉप दुरुस्त करेल.यानंतर प्ले स्टोअरवरून मोबाइलमध्येही अॅप डाऊनलोड करण्यात आले. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे कापले जाऊ लागले. जेव्हा मी कस्टमर केअर नंबरवर फोन केला, तेव्हा मला पैसे परत केले जातील असे सांगण्यात आले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे बँक अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्याने तत्काळ एटीएम, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल अॅप ब्लॉक केले. यानंतर लगेच त्यांचे सेव्हिंग अकाऊंट गोठवण्यात आले. या सायबर फसवणुकीची तक्रारही त्यांनी नॅशनल पोर्टलवर करण्यात आली.