Lok Sabha Election : भाजपच्या पत्रकार परिषदेत राडा, दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO झाला व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lok Sabha Election : भाजपच्या पत्रकार परिषदेत राडा, दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO झाला व्हायरल

Lok Sabha Election : भाजपच्या पत्रकार परिषदेत राडा, दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO झाला व्हायरल

Apr 15, 2024 10:47 PM IST

Uploksabhaelection 2024 : भाजपच्या संकल्प पत्राबाबत आयोजित पत्रकार परिषदेत भाजपमधील दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली.

भाजपच्या पत्रकार परिषदेत राडा, दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी
भाजपच्या पत्रकार परिषदेत राडा, दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी

Up lok sabha election 2024 : उत्तरप्रदेशातील अमरोहामध्ये भाजपच्या संकल्प पत्राबाबत आयोजित योगी आदित्यानाथ मंत्रिमंडळातील मंत्री बृजेश सिंह यांच्या पत्रकार परिषदेत भाजपमधील दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. भाजपच्या जिल्हा कार्यालयात माध्यमांच्या समोरच घडलेल्या या घडनेने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अन्य कार्यकर्त्यांनी कसेतरी करून दोघांना शांत केले. मात्र आता याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजपच्या जिलाध्यक्षांसमोरच ही घटना झाली. मोठ्या मुश्किलीने दोघांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. या घटनाक्रमाशी संबंधित १५ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सोमवारी दुपारच्या सुमारास उत्तरप्रदेश सरकारमधील राज्यमंत्री बृजेश सिंह अमरोहा शहरात भाजपच्या जिल्हा कार्यालयात आपल्या संकल्प पत्राबाबत पत्रकार परिषद घेत होते. येथे त्यांच्यासोबत भाजप नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगितले जात आहे की, पत्रकार परिषद संपताच पार्टीचे जिल्हा मीडिया प्रभारी रमेश कलाल व जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण कुमार यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून वाद सुरू झाला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

जिल्हाध्यक्ष उदयगिरी गोस्वामी व पार्टीतील अन्य नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या आ घटनेने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. जिल्हाध्यक्षांसह जिल्हा महामंत्री राकेश वर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष शुभम चौधरी यांना वाद मिटवला. याबाबत जिल्हाध्यक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान पार्टीचे जिल्हा मीडिया प्रभारी रमेश कलाल यांनी सांगितले की, कुटूंबात अनेक वेळी छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मतभेद होत असतात. काही गैरसमज होते ते परस्पर चर्चा करून मिटवले गेले.

..तर उमेदवारी मागे घेणार - चंद्रहार पाटील 

सांगलीत आज महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने मला उघडपणे सांगावे. मला माहिती आहे, माझ्याकडे कोणताही कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असंही ते म्हणाले आहेत.

चंद्रहार पाटील म्हणाले की, माझ्या उमेदवारांची घोषणा चारवेळा होऊनही अजूनही आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत. त्यांचं नेमकं दुखणं काय, हे अजून आमच्या लक्षात आलेलं नाही. केवळ एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, हे तुमचं दुखणं आहे?की,शिवसेना पक्षाची ताकद येथे कमी आहे,हे तुमचं दुखणं आहे?

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर