Agra Suicide Case : ऊत्तर प्रदेशातील आग्रा येथे अतुल सुभाष आत्महत्या सारखं एक प्रकरण समोर आलं आहे. बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसच्या एका मॅनेजरने पत्नीला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात रडत त्याने त्याची सर्व व्यथा व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानव शर्मा असे आत्महत्या केलेल्या टीसीएसच्या मॅनेजरचे नाव आहे. मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडिओत मानव शर्मा यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून ही टोकाचे पाऊल उचलत असल्याचं शर्मा यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पुरुष संरक्षणासाठी भक्कम कायदा असावा असे देखील शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच मृत्यूनंतर आपल्या आई-वडिलांना कोणीही त्रास देऊ नये असं म्हणतं त्याने गळफास घेतला.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या ६ मिनिटे ५६ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मानव शर्मा याने गळ्यात फास घालून त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत व्यथा व्यक्त केली आहे. मानव शर्माने व्हिडिओत म्हटलं आहे की, पोलीस आणि कायद्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी पुरुषांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदा असायला हवा, नाहीतर एक वेळ अशी येईल की असा आरोप करायला एक देखील माणूस उरणार नाही. माझं ही इतरांसारखंच आहे. माझ्या बायकोचे परपुरुषाशी संबंध असल्याचं कळलं. पण माझ्यावरच आरोप करत धमकावण्यात आलं. त्यामुळे मला मारायचे आहे. पुरुषांचा विचार करा. पुरुषांबद्दल व त्यांच्या हक्काबद्दल कोणी तरी बोलले पाहिजे. कारण पुरुष खूप एकटे पडतात.
यानंतर मानव शर्मा व्हिडिओमध्ये रडताना दिसत असून रडत रडत त्याने कुटुंबीयांची माफी मागितली आहे. तो म्हणाला, 'पप्पा सॉरी, मम्मी सॉरी.' मी जाताच सगळं ठीक होईल. बरं, मला मरायचं कसं ते कळतंय. पण तोपर्यंत मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमच्या आयुष्यातील इतर पुरुषांचा विचार करा. मी नेहमीच अपयश मानणाऱ्यांपैकी एक आहे. मी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मानव शर्माने मनगटावरील कापलेल्या खुणाही व्हिडिओत दाखवल्या.
मानव शर्मा व्हिडिओत म्हणाला, "मला सोडा, फक्त स्वतःची काळजी घ्या." तो म्हणाला, "ठीक आहे, बाहेर पडा." तुमचा कायदा व सुव्यवस्था ठीक करा, हरकत नाही.
मानव शर्मा म्हणाला की, मला सांगायचे आहे की, माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका. असं म्हणत हा व्हिडिओ शर्माने बंद केला. यानंतर मानव शर्माने आत्महत्या केली. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या