मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  whatsapp call frauds सावधान! व्हॉट्सॲप कॉलद्वारे सायबर चोरटे करतायेत फसवणूक; सरकारने जारी केला अलर्ट

whatsapp call frauds सावधान! व्हॉट्सॲप कॉलद्वारे सायबर चोरटे करतायेत फसवणूक; सरकारने जारी केला अलर्ट

Mar 30, 2024 09:45 AM IST

whatsapp call scam : व्हॉट्सॲप कॉलद्वारे सायबर गुन्हे आणि फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून ही फसवणूक टाळण्यासाठी डॉटने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये युजर्सना परदेशातून येणाऱ्या कॉल्सपासून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप कॉलद्वारे सायबर चोरटे करतायेत फसवूक
व्हॉट्सॲप कॉलद्वारे सायबर चोरटे करतायेत फसवूक (HT)

whatsapp call scam : जगभरात अब्जावधी नागरिक व्हॉट्सॲप वापरत असून आता व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांना सायबर चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲप वापऱ्यांना व्हॉट्सॲप कॉलकरून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. वाढत्या घटनांमुळे सरकारने अलर्ट जारी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NCP Sharad Pawar Candidate List : शरद पवारांच्या मावळ्यांची आज होणार यादी जाहीर; कोणत्या मतदार संघातून कुणाला उमेदवारी ?

दूरसंचार विभागाने (DOT) व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये युजर्सना परदेशी मोबाईल नंबरवरून येणाऱ्या व्हॉट्सॲप कॉल्सपासून सावध राहण्यास सांगण्यात आलं आहे. डॉटने म्हटले आहे की वापरकर्त्यांनी +९२-XXXXXXXXXX सारख्या नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डीओटीच्या नावाने केल्या जाणाऱ्या या बनावट कॉलमध्ये नंबर डिस्कनेक्ट झाला आहे किंवा नंबर बेकायदेशीरपणे वापरला जात असल्याचे सांगून यूजर्सना घाबरवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

रेल्वे प्रवास महागला! प्रवाशांचे सामान अन् माल वाहणाऱ्या कुलींच्या मजुरीत ५ वर्षांनी वाढ; असे असणार नवे दर, वाचा!

सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक आणि वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यासाठी असे कॉल केले जात आहेत. डॉटने वापरकर्त्यांना सांगितले की ते कोणालाही त्यांच्या नावाने असे कॉल करण्याची परवानगी देत असून असे कॉल आल्यास वापरकर्त्यांनी त्यावर विश्वास न ठेवता असे कॉल न उचलले बरे. जर तुम्हाला चुकून असा कॉल आला असेल तर कोणत्याही परिस्थितीत कॉलरला तुमच्या बाबत तपशील देऊ नका, असे देखील डॉटने म्हटले आहे.

दूरसंचार मंत्रालयाने व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना संचार साथी पोर्टलच्या Chakshu-Report Suspected Froad Communications वर अशा कॉलची तक्रार करण्यास सांगितले आहे. दूरसंचार सेवांच्या वापरातून होणारी आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी DOT महत्वाची भूमिका बजावते.

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा दबदबा! तब्बल १२ तासांच्या मोहिमेनंतर समुद्री चाचांपासून २३ पाकिस्तानींची सुटका

DOT ने सांगितले की वापरकर्ते संचार साधी पोर्टलला भेट देऊन आपले मोबाइल कनेक्शन योग्य आहे की अयोग्य हे तपासू शकतात. वापरकर्त्याला त्यांच्या नावावर नकळत घेतलेला मोबाईल क्रमांक दिसला तर ते त्याबद्दल तक्रार करू शकतात. यामध्ये यूजर्स आता वापरात नसलेल्या नंबरची माहितीही देऊ शकतात.

सुरक्षित भारत प्रकल्प सायबर फसवणूकीला लावणार चाप

डॉटने वापरकर्त्यांना हेल्पलाइन नंबर १९३० किंवा www.cybercrime.gov.in वर कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्हे किंवा फसवणुकीची तक्रार करण्यास सांगितले आहे. या साठी ४ मार्च रोजी चक्षू सेवा सुरू करण्यात आली. या सेवेच्या लाभ घेऊन व्हॉट्सॲप वापरकर्ते हे ऑनलाइन फसवणुक झाल्यास या बाबतची तक्रार या ठिकाणी नोंदवू शकतात. दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार सुरक्षित भारत प्रकल्पाच्या राष्ट्रीय, संघटनात्मक आणि वैयक्तिक अशा तीन स्तरांवर सायबर फसवणूक रोखण्यासाठी वेगाने काम करत आहे.

WhatsApp channel