'Viral News : ‘बटोगे तो कटोगे' हा नारा सध्या देशभरात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला हा नारा आता गुजरातमधील एका व्यक्तिने आपल्या भावाच्या लग्नपत्रिकेवर छापला आहे. त्याची ही लग्न पत्रिका व्हायरल झाली आहे. गुजरातमधील भावनगरमध्ये एका भाजप कार्यकर्त्याने त्याच्या भावाच्या लग्नाच्या कार्डवर हा नारा छापला आहे. याशिवाय कार्डवर पंतप्रधान मोदीं, योग्य आदित्यनाथ व राम मंदीराचा फोटो देखील छापला आहे. २३ नोव्हेंबरला भाजप कार्यकर्त्याच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या अनोख्या लग्नपत्रिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरयाणा निवडणुकीत हिंदूंना एकत्र आणण्यासाठी ‘बंटोगे तो कटोगे'चा नारा दिला होता. आता हा नारा महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीत देखील चांगलाच लोकप्रिय झाला आहे. लग्नपत्रिकेवर हा नारा छापणाऱ्या कार्यकर्त्यानेही याबाबत आपलं म्हणणंन मांडलं आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांना जागरूक करण्यासाठी व पंतप्रधान मोदींचा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आम्ही लग्नाच्या कार्डवर हे स्लोगन छापल्याचे भाजप कार्यकर्त्याने म्हटलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा फोटो देखील या लग्न पत्रिकेवर आहे. योगी आदित्य नाथ यांनी विविध सभांमध्ये '‘बंटोगे तो कटोगे''चा नारा दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक हैं, तो सेफ हैं' असा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. एका जातीला दुसऱ्याजातीविरुद्ध लढविणे हाच काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. एससी, एसटी आणि ओबीसींची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा अशी त्यांची इच्छा नाही.