भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट

भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट

Published Oct 23, 2024 12:53 PM IST

brics summit 2024 : ब्रिक्स परिषदेत व्लादिमीर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना हस्तांदोलन आणि मिठी मारून अभिवादन केले. तसेच भारत आणि चीन यांचे संबंध सुधारण्यासाठी पुतीन महत्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसून येत आहे.

ब्रिक्स शिखर सम्मेलन।
ब्रिक्स शिखर सम्मेलन। (AFP)

brics summit 2024 : ब्रिक्स देशांची बैठक रशियातील कझान येथे होत आहे. या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाला गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डिनरचा कार्यक्रम आयोजित केला होता. या डिनरदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एकत्र दिसले.  गलवान खोऱ्यातील तणावानंतर भारत आणि चीन संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी पुतीन हे शांतीदुताप्रमाणे काम करत असल्याचं या बैठीकीत दिसून आलं आहे. 

या बैठकीत तिन्ही जागतिक नेत्यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची ही भेट अनेक अर्थांनी खास मानली जात आहे. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. ब्रिक्स बैठकीपूर्वी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.

रशियातील कझान येथे ब्रीक्स देशांची बैठक सुरू आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. रशिया यूक्रेन युद्ध सुरू असतांना युरोपीय देशांनी रशियाला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, ब्रीक्स समीतमधून रशिया आणि चीनची जवळीक संपूर्ण जगाला दिसली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही देश अमेरिकेचे कट्टर शत्रू आहेत.

 

भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट
भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट (PTI)

मोदी यांना मिठी मारून पुतीन यांनी केले स्वागत

ब्रिक्स परिषदेत व्लादिमीर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना हस्तांदोलन आणि मिठी मारून अभिवादन केले. दोघांच्या या भेटीवरून रशिया आणि भारत यांचे जवळचे नाते असल्याचे पुतीन यांनी जगाला दाखवून दिले आहे.

रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात बुधवारी द्विपक्षीय बैठक होणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी दिली. दोन्ही देशांमध्ये चार वर्षांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष संपुष्टात आणण्यात रशियाने मोठी भूमिका बजावली आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भीषण संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध चांगलेच बिघडले होते.

ब्रिक्स बैठकीच्या डिनरदरम्यान पुतिन पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मध्ये बसले होते. या बैठकीतून पुतीन यांनी अमेरिकेसह युरोपीय देशांना तिन्ही देशांमधील घनिष्ठ राजनैतिक संबंध सुधारत असल्याचे संकेत दिले आहे. सीमेवरील तणाव सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोदी आणि जिनपिंग यांची मामल्लपुरम येथे शेवटची भेट झाली होती.

भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट
भारत चीन संबंध सुधारण्यास पुतीन बनले शांतीदूत! BRICS समिट मध्ये तिन्ही नेत्यांची भेट (AFP)

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ४ जुलै रोजी कझाकस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत आणि २५ जुलै रोजी लाओसमध्ये आसियानशी संबंधित बैठकांदरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी १२ सप्टेंबर रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स बैठकीत वांग यांची भेट घेतली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर