Unique Marriage in Valentine Week : बिहारच्या जमुई जिल्ह्य़ात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित महिलेने कर्ज वसुलीस आलेल्या बँक कर्मचाऱ्यासोबत घरातून पळून जाऊन लग्न केले. बँक कर्मचारी कर्ज वसुलीसाठी महिलेच्या घरी येत-जात होता. दरम्यान दोघांची नजरानजर झाली व एकमेकांच्या प्रेमात पडले. मागील पाच महिन्यापासून दोघे लपून छपून भेटत होते. दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे.
सांगितले जात आहे की, ११ फेब्रुवारी रोजी विवाहितेने पतीला सोडून बँक कर्मचाऱ्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जमुई नगर परिषदेच्या त्रिपुरार सिंह नदी घाटावरील बाबा भूतेश्वर नाथ मंदिरात दोघांना एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकत्र जगण्या-मरण्याच्या शपथा खाल्ल्या.
ही घटना मंगळवार (११ फेब्रुवारी) रोजी घडली आहे. बाबा भूतेश्वर नाथ मंदिरात विवाहित महिलेने हिंदूं रीति-रिवाजाने आपल्या प्रियकराशी पुन्हा लग्न केले. पवन कुमार असे बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो लछुआल पोलीस ठाणे क्षेत्रातील जाजल गावचा रहिवासी आहे. महिलेचे नाव इंद्रा कुमारी असून ती कर्माटांड गावात रहात होती.
पवन कुमार फायनान्स बँकेत काम करतो. विवाहिता महिला इंद्रा कुमारी हिने त्यांच्या बँकेतून कर्ज घेतले होते. लोनच्या रिकव्हरीसाठी पवन नियमितपणे इंद्रा कुमारीच्या घरी जात होता. दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व इंद्रा कुमारीचा जीव पवनवर जडला. दोघांमध्ये मोबाइलवर तासनतास बोलणे व्हायचे. ४ फेब्रुवारी रोजी इंद्रा पतीला सोडून पवन कुमारसोबत फरार झाली होती.
सांगितले जात आहे की, विवाहित महिला आणि बँक कर्मचारी दरम्यान प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर त्यांना समाज काय म्हणेल याची भीती सतावत ती. त्यावेळी दोघे लपून छपून भेटत असत. जवळपास पाच महिने लपून भेटल्यानंतर व्हेलेंटाइन वीकमध्ये दोघांना निर्णय घेतला की, असे किती दिवस भेटायचे. पळून जाऊन लग्न केल्यास समाजाची भीती राहणार नाही. अखेर दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला व मंदिरात जाऊन लग्न केले.
इंद्राची विवाह २०२२ मध्ये झाला होता. मात्र तिचा आरोप आहे की, तिचा पहिला पती दारुडा होता व दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. त्याच्यासोबत राहणे तिला कठीण झाले होते. इंद्राने म्हटले की, पवनसोबत लग्न केल्याने तिच्या आधीच्या सासरचे लोक व पहिल्या पतीपासून त्यांच्या जीवाला धोका आहे. तिने पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या