मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shantanu Thakur : पुढच्या सात दिवसात देशात CAA लागू होणार; भाजपच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Shantanu Thakur : पुढच्या सात दिवसात देशात CAA लागू होणार; भाजपच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 29, 2024 11:52 AM IST

Shantanu Thakur on CAA : केंद्र सरकार व काही राज्यांमध्ये वादाचा विषय ठरलेल्या नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.

Shantanu Thakur on CAA
Shantanu Thakur on CAA

Shantanu Thakur on CAA : अयोध्येतील राम मंदिरांचं उद्घाटन, बिहारमध्ये ऑपरेशन लोटस फत्ते केल्यानंतर आता देशात नागरिकत्व कायदा लागू करण्याची तयारी केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनीच ही माहिती दिली आहे. येत्या सात दिवसांत देशभरात सीएए लागू होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

शंतनू ठाकूर हे पश्चिम बंगालमधील बनगाव मतदारसंघाचे खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी सरकारच्या पुढील निर्णयाची माहिती दिली. 'राम मंदिराचं अनावरण आधीच झालं आहे. आता पुढील एका आठवड्यात सीएए संपूर्ण भारतात लागू होणार आहे. हे मी गॅरंटीवर सांगत आहे, असं ठाकूर म्हणाले.

Indian Army : भारतीय लष्करानं बदलले फिटनेसचे नियम; जवानांच्या सुट्टीवर होणार परिणाम

'ममता बॅनर्जी म्हणतात, तुमच्याकडं मतदार कार्ड असेल, आधार कार्ड असेल तर तुम्ही नागरिक आहात. तुम्ही मतदान करू शकता पण तरीही हजारो लोक यापासून वंचित असल्याचं मी ऐकलं आहे. जे लोक राज्यात आले आहेत ते नागरिक आहेत, असं मुख्यमंत्री का सांगताहेत? एखाद्या नागरिकानं पासपोर्ट पडताळणीसाठी DIB कडं संपर्क साधला तर विभाग त्याला १९७१ पूर्वीचे कागदपत्र का विचारले जात आहे? या प्रश्नाचं उत्तर पोलीस प्रशासनाला द्यावं लागणार आहे. पासपोर्टची पडताळणी मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड पाहून व्हायला हवी. मात्र, राज्य सरकार राजकारणात गुंतलं आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला.

CAA लागू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही - अमित शहा

नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही. हा राष्ट्रीय कायदा आहे. आमचा पक्ष हा कायदा लागू करण्यास बांधील आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप अमित शाह यांनी मागील महिन्यात केला होता. सीएए कायद्याचा उद्देश पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानसह तीन शेजारील देशांतील सहा समुदायांना जलद नागरिकत्व देणं हा आहे. हा कायदा मंजूर झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे नियम अद्याप ठरलेले नाहीत.

WhatsApp channel

विभाग