Nitin Gadkari: "देशातील हिंदू मंदिरे अस्वच्छ, मी..."; नितीन गडकरी यांच विधान चर्चेत
Nitin Gadkari on Hindu Temples: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील हिंदू मंदिरांमध्ये असलेल्या अस्वच्छतेवरून मोठे वक्तव्य केले आहे. देशातील मंदिरात स्वच्छतेचं पालन केलं जात नाही असं गडकरी म्हणाले. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Nitin Gadkari on Hindu Temples: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टव्यक्त पणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी बुधवारी देशातील हिंदू मंदिरांबाबत महत्वाचे विधान केले आहे. मंदिरात असलेल्या अस्वच्छतेवर त्यांनी बोट ठेवले आहे. गडकरी म्हणाले, हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचे पालन केल्या जात नाही. या उलट परदेशातील धर्मस्थळात या बाबत काळजी घेतली जाते, असे गडकरी म्हणाले. दरम्यान, त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
केंद्रीय मंत्री निनीत गडकरी हे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. नितीन गडकरी म्हणाले की, देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते. मला वाटतंय आपला देश असा आहे की, जिथे हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. येथील धर्मशाळा चांगल्या नाहीत. परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च येथील वातावरण पाहून मला वाटलं की, आपली प्रार्थनास्थळं चांगली असावीत. मला जेव्हा याबाबात काहीतरी करण्याची संधी मिळाली त्यावेळी मी, महाराष्ट्रातल्या देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींची मान्यता दिली. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.
weather update : राज्यात लवकरच धडकणार मॉन्सून; पूर्व मौसमी पावसामुळे उष्णतामानात होणार मोठी घट
गडकरी यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्वी नेपाळमधून जावे लागत होते. मात्र, या दरम्यान खूप कमी असायचे यामुळे कामादरम्यान, अडचणी आल्या. प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) अचूक बनवण्याची गरज आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या मार्गांवर देखील त्यांनी चर्चा केली.
विभाग