Nitin Gadkari : पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असताना नितीन गडकरी यांची शुगर वाढली; बैठकीतून पडले बाहेर
Nitin Gadkari Health news updates : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद (सीओएम) सुरू असतांना नितीन गडकरी यांची शुगर वाढल्याने त्यांना बैठकीतून बाहेर पडावे लागले.
दिल्ली : दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सुरू असलेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अचानक शुगर वाढल्याने त्यांना बैठकीतून बाहेर पडावे लागले. गडकरी यांना या पूर्वीही शुगरमुळे भोवळ आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठीक झाली. या बैठकीत अनेक नेते मंडळी हजर होती. या बैठकीत अनेक धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली. मात्र, ही बैठक सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अचानक शुगर वाढल्याने त्यांना या बैठकीतून बाहेर पडावे लागले. गडकरींना मधुमेहाचा त्रास असून त्यांची शुगर ही कमी जास्त होत असते. बैठकी दरम्यान, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गडकरी हे बाहेर पडले. नितीन गडकरी मंत्री परिषदेतून बाहेर पडल्यावर ते त्यांच्या निवासस्थानी आले. घरी आल्यावर त्यांनी आपली औषधे घेतल्यावर त्यांना बरे वाटू लागले. बैठक संपण्याआधी २० मिनिटे ते बैठकीतून बाहेर पडले.
नितीन गडकरींना २०२२मध्ये भर सभेत मधुमेहामुळे त्रास झाला होता. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील एका कार्यक्रमात भाषण देताना गडकरींना भोवळ आली होती. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची रक्तातील साखर कमी झाल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सनिगळे होते. तर २०१८ मध्येही अहमदनगरमधील एका कार्यक्रमात गडकरींची प्रकृती खालावली होती. जानेवारी २०१९ मध्ये सोलापूरमध्ये गडकरींची प्रकृती खराब झाली होती.
विभाग