HD kumaraswamy : पत्रकार परिषद सुरू असतानाच एच. डी. कुमारस्वामी यांच्या नाकातून येऊ लागले रक्त, रुग्णालयात दाखल, VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  HD kumaraswamy : पत्रकार परिषद सुरू असतानाच एच. डी. कुमारस्वामी यांच्या नाकातून येऊ लागले रक्त, रुग्णालयात दाखल, VIDEO

HD kumaraswamy : पत्रकार परिषद सुरू असतानाच एच. डी. कुमारस्वामी यांच्या नाकातून येऊ लागले रक्त, रुग्णालयात दाखल, VIDEO

Updated Jul 28, 2024 08:43 PM IST

hd Kumaraswamy : केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामीयांच्या नाकातून रक्त येऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत एच.डी. कुमारस्वामी यांच्या नाकातून येऊ लागले रक्त
पत्रकार परिषदेत एच.डी. कुमारस्वामी यांच्या नाकातून येऊ लागले रक्त

केंद्रीय मंत्री एच.डी कुमारस्वामी यांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर बंगळुरूतील जयानगर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नाकातून रक्त येऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुमारस्वामी रविवारी बेंगळुरूमध्ये भाजपा-जेडीएस नेत्यांच्या एका बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यांचा शर्ट रक्ताने भिजला. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

कुमारस्वामी रूमालाच्या सहाय्याने नाकातून वाहत असलेले रक्त थांबवण्याचा प्रयत्ना करताना दिसले. रक्ताने त्यांचा शर्ट माखला होता.

भाजपा-जेडीएस नेत्यांची बैठक -

कर्नाटक प्रदेश भाजपा अध्यक्ष बीवाई विजयेंद्र, कुमारस्वामी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वात भाजप-जेडीएस नेत्यांची रविवारी बैठक पार पडली. विजयेंद्र यांनी सांगितले की, बैठकीत म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (MUDA)घोटाळा तसेच कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर चर्चा झाली. भाजप आणि जेडीएसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत सिद्धारमय्या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत सखोल चर्चा केली. एसटी विकास महामंडळ घोटाळ्यात अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी असलेल्या पैशांची काँग्रेसने लुट केली आहे.

भाजपा-जेडीएस ३ ऑगस्टपासून काढणार पदयात्रा -

भाजपा आणि जेडीएस ३ ऑगस्टपासून पदयात्रा काढणार आहेत. आजच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला. बीएस येदियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा सात दिवस चालणार असून ३ ऑगस्ट रोजी सुरू होऊन १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात्रेच्या सांगता कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय नेतेही सहभागी होणार आहेत.

नीती आयोगाच्या बैठकीत राडा! ममता बॅनर्जी अर्ध्यातच बाहेर पडल्या

नीती आयोगानं बोलावलेल्या बैठकीत शनिवारी जोरदार राडा झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाच्या पदाधिकाऱ्यांवर भेदभावाचा व अन्यायाचा आरोप करत बैठक अर्ध्यावरच सोडली. बैठकीतून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ममतांचा आक्षेप बोलण्यासाठी पुरेसा वेळ न देण्याबद्दल होता. 'मी बोलत असताना माझा मायक्रोफोन मुद्दाम बंद करण्यात आला. त्यामुळं मला भाषण पूर्ण करता आलं नाही.

तुमच्या मित्रपक्षांना जास्त वेळ देत आहात. विरोधी पक्षांच्या वतीनं एकटी मी इथं आहे, तरीही तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात... हा केवळ बंगालचाच नाही तर सर्व प्रादेशिक पक्षांचा अपमान आहे...,' असं ममतांनी सुनावलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर