Onion Rate Hike : कांद्याच्या वाढत्या किमतींनी डोळ्यात पाणी आणू नये म्हणून सरकारची नवी योजना!-union government is planning to procure five lakh tonnes of onions for buffer stock ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Onion Rate Hike : कांद्याच्या वाढत्या किमतींनी डोळ्यात पाणी आणू नये म्हणून सरकारची नवी योजना!

Onion Rate Hike : कांद्याच्या वाढत्या किमतींनी डोळ्यात पाणी आणू नये म्हणून सरकारची नवी योजना!

Mar 09, 2024 06:50 PM IST

Onion Price : कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक करणार आहे.

केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक करणार
केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक करणार

Onion Price: केंद्र सरकार यावर्षी आपल्या बफर स्टॉकसाठी ५ लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आखत आहे. याचा वापर कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे यावर्षी कांद्याच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारकडून NCCF (नॅशनल कोऑपरेटिव कंज्यूमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि.) आणि  NAFED (नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.) या संस्था कांदा खरेदी करतील. अन्न व पुरवठा मंत्रालयाने गेल्यावर्षी ५ लाख टन कांद्याचा बफर स्टॉक बनवला होता. यातील एक लाख टन कांदा अजूनही शिल्लक आहे. 

‘बफर स्टॉक’ मधून कमी दरात कांदा विक्री केल्यामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला मदत मिळाली आहे. सरकारने या महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा निर्यातीवर प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेईल. ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, २०२३-२४ मध्ये जवळपास २५४.७३ लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे, तर गेल्या वर्षी ते सुमारे अधिक म्हणजे ३०२.०८ लाख टन होते.  सरकारने नुकतीच काही देशांमध्ये कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडमार्फत (NCEL) भूतान, बहरीन आणि मॉरिशसला ४,७५० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

विभाग