ऊस उत्पादक व कारखानदारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती प्रक्रिया करण्यास बंदी लादली आहे. ऊस उत्पादनात घट झाल्याने सध्या देशात साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारने २०२३-२४ या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ लागू झाला आहे. परंतु बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे. या निर्णयाबाबत मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयालाही कळवले आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील साखरेचे उत्पादन, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवतो. ज्यामुळं स्थिर किंमतीवर साखरेची उपलब्धता निश्चित होते.
भारत सरकार साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदीबाबतच्या बातम्या येताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे ८ टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखरेचे भाव खाली येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या