Union Budget 2025 : कॅन्सरसह विविध आजारांवरील ३६ जीवनावश्क औषधं स्वस्त होणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget 2025 : कॅन्सरसह विविध आजारांवरील ३६ जीवनावश्क औषधं स्वस्त होणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Union Budget 2025 : कॅन्सरसह विविध आजारांवरील ३६ जीवनावश्क औषधं स्वस्त होणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Feb 01, 2025 12:55 PM IST

36 Life Saving Drugs To Be Cheaper: अर्थसंकल्पात कॅन्सरसह ३६ जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

कॅन्सरसह ३६ जीवनावश्क औषधं स्वस्त होणार!

Budget 2025 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात कॅन्सरसह ३६ जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आल्याची घोषणा केली. यामुळे कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय २०२५ च्या भाषणात ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाणार असल्याची घोषणा केली. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोग डे केअर सेंटर बांधले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. कर्करोग उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधे स्वस्त होतील. ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्के कमी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी डेकेअर कॅन्सर सेंटरची घोषणा केली. जीवनरक्षक महत्त्वाच्या औषधांना सीमा शुल्कातून सूट देण्याबरोबरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डेकेअर कॅन्सर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. २०२५-२६ मध्ये केंद्र सरकार जिल्हा रुग्णालयांमध्ये २०० डे केअर सेंटर उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. येत्या काही वर्षांत आणखी केंद्रे स्थापन केली जातील.

२०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन म्हणाल्या की, गिग वर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत (पीएम-जेएवाय) आरोग्य सुविधा पुरविल्या जातील. पुढील पाच वर्षांत ७५ हजार जागा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये १० हजार जादा जागांची भर पडणार आहे. येत्या तीन वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. २०२५-२६ मध्येच २०० केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

पीएम-जेएवाय अंतर्गत गिग वर्कर्सना आरोग्य सुविधा पुरविल्या जातील आणि या उपायामुळे सुमारे 1 कोटी कामगारांना मदत होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा सीतारामन यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये जागा वाढविण्याबाबत त्या म्हणाल्या, आमच्या सरकारने १० वर्षांत पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या सुमारे १.१ लाख जागा वाढविल्या आहेत, ज्यात १३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

|#+|

पुढील पाच वर्षांत ७५ हजार जागा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये १० हजार जादा जागांची भर पडणार आहे. सर्व शासकीय माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर