Bank Job 2024: युनियन बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून (३ फेब्रुवारी २०२४) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार www.unionbankofindia.co.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाऊ शकते.
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण ६०६ स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी अर्ज मागिवले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे. यापूर्वी इच्छुक उमेदवार यूआयबी बँकेच्या अधिकृत वेबसाईट जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेत अर्ज आणि पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा, अर्ज स्क्रीनिंग किंवा वैयक्तिक मुलाखतीचा समावेश असू शकतो.
जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे. तर, एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून १७५ रुपये अर्ज शुल्क आकारला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या