UBI Recruitment: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, १५०० जागांवर भरती, महाराष्ट्रात 'इतक्या' जागा!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UBI Recruitment: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, १५०० जागांवर भरती, महाराष्ट्रात 'इतक्या' जागा!

UBI Recruitment: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, १५०० जागांवर भरती, महाराष्ट्रात 'इतक्या' जागा!

Oct 29, 2024 04:31 PM IST

Union Bank of India Recruitment: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लोकल बँक ऑफिसर पदांच्या १५०० जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती सुरू
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती सुरू (Reuters)

Union Bank of India LBO Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये लोकल बँक ऑफिसर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार unionbankofindia.co.in येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरती मोहिमेमुळे संस्थेतील १५०० पदे भरली जाणार आहेत. नोंदणी प्रक्रियेला २४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात झाली. तर, १३ नोव्हेंबर २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात राबवली जाणार आहे. 

कुठे किती जागा रिक्त?

  • आंध्र प्रदेश: २०० पदे
  • आसाम : ५० पदे
  • गुजरात : २०० पदे
  • कर्नाटक : ३०० पदे
  • केरळ : १०० पदे
  • महाराष्ट्र : ५० पदे
  • ओडिशा: १०० पदे
  • तामिळनाडू : २०० पदे
  • तेलंगणा : २०० पदे
  • पश्चिम बंगाल : १०० पदे

पात्रता आणि वय

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून कोणत्याही विषयात पूर्णवेळ / नियमित बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय किमान २० ते कमाल ३० वर्षापर्यंत असायला हवे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी अर्जदाराची ऑनलाइन परीक्षा होईल. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षेत १५५ प्रश्न असतील आणि जास्तीत जास्त गुण २०० असतील. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापण्यात येतील. चुकीच्या उत्तराला गुणांपैकी एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ इतका गुण वजा केला जाईल.

अर्ज शुल्क

जनरल/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ८५०/- रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी १७५/- रुपये आहे. डेबिट कार्ड (रुपे / व्हिसा / मास्टरकार्ड / मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट / यूपीआय वापरुन पेमेंट केले जाऊ शकते.

एनआयटीमध्ये नोकरी

एनआयटी जालंधर येथे प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार एनआयटी जालंधरच्या अधिकृत वेबसाइटवरून nitj.ac.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत सहायक प्राध्यापक ग्रेड-२ (६९ जागा), सहायक प्राध्यापक ग्रेड- १ (२६ जागा), असोसिएट प्रोफेसर (३१- जागा) आणि प्रोफेसर (जागा- ६) अशी एकूण १३२ जागा भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एनआयटीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर