Minor Girl Rape In Ludhiana: पंजाबच्या लुधियाना येथे अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेले असता धक्कादायक घटना उगडकीस आली. वैद्यकीय अहवालात ही मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांना गर्भधारणा झाल्याचे लक्षात आले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीकडे विचारणा केली असता एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली.
फुलनवाल गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईच्या जबाबानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, मंगळवारी तिच्या मुलीच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि ती तिला तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांना तिची मुलगी सुमारे सात आठवड्यांची गरोदर असल्याचे समजले.
याबाबत विचारणा केली असता पीडित मुलीनेसांगितलेकी, दोन महिन्यांपूर्वी ती जवळच्या किराणा दुकानात गेली होती, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने तिलानिर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडिताला याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या हा प्रकार आई- वडिलांना सांगितला नाही.
या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक उपनिरीक्षक सरज कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
या घटनेने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटने लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. लुधियाना येथील घटनेने यात आणखी भर टाकली आहे.
संबंधित बातम्या