Shocking Momo Viral Video: मोमोज हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. लाल हिरव्या चटणीसोबत अनेक जण मोमोजवर ताव मारत असतात. मात्र, या मोमोजचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमची मोमो खाण्याची इच्छा कायमची मारून जाईन. हा व्हिडिओ पाहिल्यावर नागरिक थेट पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांनी मोमो तयार करणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे.
मोमो हा जगातील बहुतांश खवय्यांचा आवडता पदार्थ आहे. हा पदार्थ मूळचा तिबेट व चीनमधील असून तो भारतात देखील चवीने खाल्ला जातो. व्हेज आणि नॉन व्हेज ऊं दोन्ही प्रकारात मोमोज मिळणात. मात्र, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मोमो तयार करण्याआधी त्याचं पीठ एका भांड्यात टाकून पायानं मळलं जात असल्याचं पुढलं आलं आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक व्यक्ति ही बनियान आणि अन्डरपॅन्टवर असल्याचं दिसत आहे. हा व्यक्ति रस्त्याच्या कडेला मोमो विक्री करत असून मोमो तयार करण्यासाठी या व्यक्तिनं मोसाचं पीठ हे चक्क पायानं मळलं आहे. मोंओच्या पिठाच्या भांड्यात हा व्यक्ति उभा असून त्यात नाचून तो पीठ मळत आहे. या व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा विडिओ २२ सेकंदाचा आहे. शुक्रवार संध्याकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असून स्थानिक नागरिकानी या घटनेवर संताप व्यक्त करत मोमो विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ पाहून जबलपूर जिल्ह्यातील काही नागरिकांनी थेट पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. ज्या मोमोच्या दुकानामध्ये अशापद्धतीने मळलेल्या पिठाचे मोमो विकले जातात ते दुकान येथील बारगी पोलीस ठाण्याजवळ आहे. दुकानाचा मालक हा मूळचा राजस्थान येथील आहे.
नागरिकांनी केलेल्या कारवाईची दखल घेत पोलिसांनी दुकानाचा मालक व आणखी एकाला अटक केली आहे. राजकुमार गोस्वामी व सचिन गोस्वामी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ते मूळचे राजस्थानमधील जबलपूर येथील रहिवाशी आहेत. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांचया दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.