VIDEO : मित्रांनी रिक्षा देण्याची पैज लावल्याने जळत्या फटाक्यांवर बसला बेरोजगार तरुण, तरुणाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : मित्रांनी रिक्षा देण्याची पैज लावल्याने जळत्या फटाक्यांवर बसला बेरोजगार तरुण, तरुणाचा मृत्यू

VIDEO : मित्रांनी रिक्षा देण्याची पैज लावल्याने जळत्या फटाक्यांवर बसला बेरोजगार तरुण, तरुणाचा मृत्यू

Nov 04, 2024 07:59 PM IST

बेंगळुरूमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा फटाका पेटीवर बसून झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला मित्रांनी आव्हान दिले होते की, तसे केल्यास रिक्षा देऊ.

फटाक्यांच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू
फटाक्यांच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

दिवाळीच्या रात्री मित्रांशी लावलेली पैज एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे.  रिक्षाची पैज जिंकण्यासाठी युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. बेंगळुरूमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा फटाक्यांच्या पेटीवर बसून झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी तरुणाचे मित्रही त्याच्याजवळ होते. फटाक्यांच्या डब्यावर बसल्यास रिक्षा विकत घेऊन देऊ, अशी पैज लावली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबरीश (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. शबरीश आणि त्याचे मित्र ३१ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर दिवाळी साजरी करत होते आणि मद्यधुंद अवस्थेत होते. शबरीशच्या मित्रांनी त्याला फटाक्यांच्या  बॉक्सवर बसण्याचे आव्हान दिले. ही पैज जिंकली तर बक्षीस म्हणून रिक्षा विकत घेऊन, असे त्यांनी त्याला सांगितले.

बेरोजगार शबरीश याने मित्रांचे हे आव्हान स्वीकारले. मात्र यातच त्याचा मृत्यू झाला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे.  व्हिडिओमध्ये दिसते की, शबरीशचे मित्र फटाक्यांच्या पेटीला आग लावून पळून जाताना दिसत आहेत. बॉक्सचा स्फोट झाला आणि शबरीश बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्याचे व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे. यावेळी त्याचे मित्र त्याच्या जवळ जातात. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला त्याचे मित्र रुग्णालयात घेऊन जातात.

मात्र, शबरीशचा जीव वाचू शकला नाही. २ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. शबरीशच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी साऊथ लोकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शबरीश बेरोजगार होता आणि त्याने मित्रांच्या आश्वासनानुसार रिक्षाची ऑफर मान्य केली होती.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर