viral news : नोकरी सोडून बेरोजगार पतीला मदत करणाऱ्या एका महिलेला मोठा धक्का बसला आहे. बेरोजगार पती हा पैसे कमावण्यासाठी तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून विकत असल्याचे समजल्यावर तिच्या पायाखालील वाळू सरकली आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संतापलेल्या पत्नीने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे या दोघांना एक मूलही आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलेशियातील एका महिलेने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली आहे. चायना प्रेसचा हवाला देत साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या संदर्भात वृत्त दिले आहे. पिडीत महिलेने पोस्टमध्ये सांगितले की तिचे लग्न होऊन चार वर्षे झाली आहेत आणि दोघांनाही एक मूल आहे. रिपोर्टनुसार, महिलेचे म्हणणे आहे की, पती थकल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती.
रिपोर्टनुसार, महिलेनेही पतीच्या निर्णयाला पाठिंबा देत स्वत: कुटुंब चालवण्याचा निर्णय घेतला होता. तिच्याकडे असलेल्या काही बचतीतून आणि ती स्वतः काम करत घर सांभाळत होती. दरम्यान, महिलेच्या पतीला महिनाभरापूर्वी काही रक्कम मिळाल्याचे समजले. तेव्हा तिला वाटले की पत्नीने काहीतरी काम करून पैसे गोळा केले असावेत.
रिपोर्टनुसार, पिडीत महिलेले जेव्हा तिच्या पतीचा नकळत फोन पाहिल्यावर तिला जबर धक्का बसला. तिला कळले की तिचा पती हा काही अनोळखी लोकांशी बोलत असे. एवढेच नाही तर तो तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ त्यांना विकण्यात आले होते. ही छायाचित्रे पतीने काढली होती. तसेच हे फोटो कोणालाही शेअर करायची नाही असे देखील फोटो विकलेल्या व्यक्तीला पत्नीने सांगितले होते. महिलेने सांगितले की, या बाबत तिने पतीला जाब विचारला. यानंतर त्याने या बाबत नकार देत सर्व पुरावे नष्ट केले. यानंतर तो फोन घेऊन निघून गेला.
अहवालानुसार, महिलेचे म्हणणे आहे की पुरावे गोळा करण्यासाठी तिने तिच्या पतीशी भांडण केले नाही तसेच त्याच्याशी नातेही तोडले नाही. विशेष म्हणजे जेव्हा पतीने तिचे नग्न फोटो काढूयात म्हटल्यावर तिने न्यूड फोटो काढण्यास नकार दिला. यानंतर सर्व सत्य बाहेर आले. तेव्हा पतीने तिच्यावर आपल्या गरजा पूर्ण न केल्याचा आरोप केला. शेवटी पतीने कबूल केले की पैशाची गरज असल्याने त्याने नग्न फोटो आणि व्हिडिओ विकले होते.
संबंधित बातम्या